India’s GDP accelerates sharply to 8.2% in FY26 Q2, reflecting strong economic momentum. saam tv
बिझनेस

India GDP: भारताची अर्थव्यवस्था बुलेट स्पीडनं सुस्साट; GDPनं गाठला मोठा टप्पा, 'या' क्षेत्रात जबरदस्त कामगिरी

India GDP Growth: आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केलीय. भारताची जीडीपी ८.२ टक्के वाढ झालीय.

Bharat Jadhav

  • आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.२टक्क्यांच्यावर

  • दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रांनी मोठी कामगिरी

  • आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण विकास दर ८ टक्के

भारतीय अर्थव्यवस्थेने बुलेट ट्रेनसारखी गतीधारण केलीय. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ५.६ टक्के होता. आता हा जीडीपीनं तुफान वेग धारण केलाय.आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाही म्हणजेच जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत भारताचा जीडीपी ८.२ टक्के इतका झालाय. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ५.६ टक्के जीडीपी होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. यामुळे आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत विकास दर ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत ६.१ टक्के होता.

अमेरिकेनं भारतावर ५० टक्के टॅरिफ लावलाय. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात. या पैशांचा वापर रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धात फंड म्हणून करत आहे, त्यामुळे युद्धविराम होत नसल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा मोठा परिणाम भारताच्या जीडीपीवर होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र हे सगळे अंदाज चुकीचे ठरताना दिसत आहेत. कारण जीडीपीची आकडेवारी समोर आली असून, भारतानं मोठी झेप घेतल्याचं दिसत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर कालावधीत देशाचा नाममात्र जीडीपी ८.७ टक्के दराने वाढला असल्याची माहिती मंत्रालयानं दिलीय. दरम्यान दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रांची मजबूत कामगिरीमळे जीडीपी वाढीचा दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त राहिलाय, असं सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत दुय्यम क्षेत्राचा विकास दर ८.१ टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा विकास दर ९.२ टक्के होता.

दुय्यम क्षेत्रात येणाऱ्या उत्पादन क्षेत्राचा विकास दर ९.१ टक्के आणि बांधकाम क्षेत्राचा विकास दर ७.२ टक्के राहिला आहे. तृतीयक क्षेत्रातील वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांमध्ये १०.२ टक्के वाढ झालीय. सरकारी आकडेवारीनुसार, कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ३.५ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत खासगी उपभोग खर्च (PFCE) पीएफसीई ७.९ टक्क्यांनी वाढला. हा मागील आर्थिक वर्षात ६.४ टक्के होता. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत निर्यात ५.६ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ३ टक्के होती. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर कालावधीत आयात १२.८ टक्क्यांनी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT