Indian Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Diwali Scheme : टपाल खात्याची खास दिवाळी भेट! नोंदणी करून घरबसल्या विदेशात पाठवता येणार 'या' गोष्टी ,जाणून घ्या सविस्तर

Indian Post Office Scheme : भारतीय टपाल खात्याने दिवाळीच्या निमित्ताने खास घरपोच पार्सल सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहकांच्या घरातूनच फराळ किंवा भेटवस्तूंचे पार्सल गोळा केले जाईल, तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता.

Alisha Khedekar

  • भारतीय टपाल खात्याने दिवाळी पार्सलसाठी घरपोच सेवा सुरू केली

  • कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता घरून पार्सल घेऊन जाणार

  • फूड ग्रेड बॉक्स आणि सुरक्षित पॅकिंगची सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध

  • परवडणारी, सुरक्षित आणि विश्वासार्ह अशी ही सेवा नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे

विदेशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नातेवाइकांना, कुटुंबीयांना दिवाळीचा घरगुती पाठवण्यासाठी टपाल खात्याने विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला टपाल खात्याच्या कार्यालयात जाण्याचीही गरज भासणार नाही. नोंदणी केल्यावर त्यांचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन पार्सल घेऊन जातील व विशेष म्हणजे त्यासाठी कोणेतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

खाजगी कुरिअर कंपन्यांतर्फे विदेशात दिवाळी फराळ पाठवणे महाग ठरत असून त्या तुलनेत टपाल खात्यातर्फे हा फराळ पाठवल्यास स्वस्त पडेल, असा दावा टपाल खात्याने केला आहे. शिवाय पार्सलसाठी विशेष फूड ग्रेड बॉक्सेस आणि सुरक्षित पॅकिंगची सोय पोस्ट ऑफिसमध्येच करण्यात आली आहे. पोस्टाची ही सेवा सर्वात स्वस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इतर खाजगी कुरिअर कंपन्यांपेक्षा टपाल खात्याची सेवा परवडणारी असून विश्वासात्मक आहे, असे मत नागरिकांनी वर्तवले असून या सेवेला पसंती दिली आहे. काळाच्या ओघात बंद होत चाललेल्या टपाल खात्याला मिळणार हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. असं म्हणायला हरकत नाही.

फराळ किंवा इतर पार्सल पाठवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने सर्वात स्वस्त सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. ग्राहकांच्या घरापासून किंवा कार्यालयापासून त्यांचे पार्सल आमचे कर्मचारी स्वीकारतात, त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. असे एका पोस्टमास्टर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

परदेशात कसा पाठवाल फराळ ?

तुम्हाला देखील तुमच्या प्रियजनांना यंदाच्या दिवाळीत परदेशात फराळ पाठवायचा असेल तर पोस्ट सेवा बेस्ट ठरू शकते. मात्र हा फराळ परदेशात कसा पाठवायचा ? तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या.

  • सर्वात आधी तुम्हांला तुमची नोंदणी करावी लागेल.

  • या नोंदणीत तुम्हांला तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर तसेच आवश्यक माहिती पोस्ट खात्याला द्यावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हांला तुमचा फराळ पोस्टात घेऊन जाता आला नाही तर पोस्टाचे कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येऊन किंवा कामाच्या ठिकाणी येऊन फराळ घेऊन जाणार असल्याची सोया पोस्ट खात्याने केली आहे. ( विनाशुल्क )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyeliner Tips: आयलायनर लावण्यासाठी सोप्या टिप्स; डोळ्यांना द्या परफेक्ट लूक

Prarthana Behere Photos: कपाळी टिकली अन् नाकात नथनी, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा सुंदर साज

Mumbai Crime : मुंबईत २० हून अधिक घरे, शेकडो भक्त; किन्नरांच्या गुरुला अटक, बांग्लादेश कनेक्शन उघड

Maharashtra Live News Update: मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांचे मंचावर आगमन.

तेरी मेहरबानियाँ ! मालकाचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कार झाले; निष्ठावान कुत्रा स्मशानभूमीतच राहिला, ९ दिवस...

SCROLL FOR NEXT