Diesel Prices  Saam Tv
बिझनेस

पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय, करात ३ रुपयांची वाढ, इंधनाच्या दरात आणखी वाढ होणार होणार?

Petrol Export Duty Hiked : केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर ३ रुपयांचे विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशात इंधन दरवाढीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

Petrol Diesel price today : केंद्र सरकारने पेट्रोलवर कठोर आणि मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर ३ रुपयांचे विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे आता पेट्रोलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांपासून ते सरकारांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत. या वाढलेल्या किमतींमुळे सरकारांवर मोठा दबाव येत आहे. त्यामुळे देशांतर्गत महागाईत मोठी वाढ होत आहे.

पेट्रोलच्या निर्यातावर उत्पादन शुल्क लावले असले तरी सरकारने डिझेल आणि एटीएफवरील शुल्क कमी केले होते. आखाती देशातील तणावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अनेक देशात इंधनाचे संकट ओढावले आहे. भारतामध्येही इंधनाचा तुटवडा पडलाय, पंपाबाहेर पेट्रोल-डिझेलच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरेल ११० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका उडणार का? असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात आहे.

फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७० डॉलरच्या आसपास होती. पण आता प्रति बॅरल ११० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जगभरात इंधनाचे संकट ओढावले आहे. अनेक देशात इंधनाची कमतरता जाणवत आहे. एका सरकारी आदेशानुसार, डिझेलच्या निर्यातीवरील शुल्क प्रति लिटर २३ रुपयांवरून १६.५० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. एटीएफवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क प्रति लिटर ३३ रुपयांवरून १६ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ असा की तेल कंपन्यांना सरकारी सवलत मिळतच आहे.

शुल्कवाढीमुळे पेट्रोल महाग होईल का? असा सवाल अनेकांच्या डोक्यात आहे. पण यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही. कारण, ही वाढ निर्यातीवर करण्यात आली. त्यामुळे, या निर्णयाचा देशांतर्गत बाजारावर कोणताही परिणाम होणार नाही. शुक्रवारी तेल विपणन कंपन्यांनी तेलाच्या किमती वाढवल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांनी वाढ करण्यात आली. २०२२ नंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT