Har Ghar Tiranga Saam Tv
बिझनेस

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' प्रमाणपत्र पाहिजे? प्रक्रिया अतिशय सोपी, फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा

Siddhi Hande

१५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले प्राण गमावले. त्यामुळेच आज आपल्या देशात आपण मनमोकळेपणाने जगू शकतो. संपूर्ण देशभरातील लोक मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या वर्षी आझादी का अमृतमहोत्सवाचे तिसरे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. (Har Ghar Tiranga Certificate)

२०२२ पासून 'आझादी का अमृतमहोत्सव' सुरु करण्यात आला. भारत सरकारने आझादी का अमृतमहोत्सवसाठी हर घर तिरंगा ही मोहिम सुरु केली. त्यावेळी प्रत्येक भारतीय नागरिकाला घराबाहेर तिरंगा लावायला सांगितले होते.५ कोटी भारतीयांना हातात तिरंगा घेऊन फोटो काढले होते. हे फोटो वेबसाइटवर अपलोड करण्यास सांगितले आहे.

या वर्षी ८ ऑगस्ट २०२४ हे हर घर तिरंगाचे तिसरे वर्ष आहे. यावर्षी ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत ही मोहिम राबवण्यात येणार आहे. हे फोटो तुम्हाला हर घर तिरंगाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करावे लागते.या अधिकृत वेबसाइटवरुन तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

हर घर तिरंगाचे सर्टिफिकेच कसं प्राप्त करायचे?

  • हर घर तिरंगा मोहिमेचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला harghartiranga.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

  • यानंतर तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी अपलोड करावा लागेल. त्यानंतर Click To Participate वर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, नंबर अशी माहिती भरावी लागणार आहे.

  • यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तिरंगा हातात घेऊन सेल्फी अपलोड करावा लागेल.

  • यानंतर Generate Certificate या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT