EPFO Money Withdraw Rules Saam Tv
बिझनेस

EPFO Money Withdraw Rules: पीएफ खात्यातून पैसे कसे काढाल? टॅक्स कोणत्या व्यक्तीला भरावा लागतो? जाणून घ्या EPFO चे नियम

Income Tax Rules On EPFO Withdrawal : आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना पीएफच्या रकमेवर अधिक व्याजदर मिळणार आहे.

कोमल दामुद्रे

Tax Rules On PF Withdrawal : नुकतेच केंद्र सरकारने ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना पीएफच्या रकमेवर अधिक व्याजदर मिळणार आहे. अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

असे म्हटले जाते की, निवृत्तीपूर्वी पीएफची रक्कम काढू नये असा सल्ला आपल्याला आर्थिक सल्लागार नेहमी देतात. नोकरीनंतर आपल्याला अनेक प्रकाराच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी आपण EPFO चे खाते उघडतो. परंतु, काही विशेष वेळीच पीएफची रक्कम आपल्याला आधी काढता येते. मधल्या काळात पीएफचे पैसे काढण्यासाठीही कर भरावा लागतो. त्याच्याशी संबंधित कामाचे नियम काय आहेत ते जाणून घ्या.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) कायदा 1952 नुसार कर्मचार्‍यांच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जाते. ईपीएफओचा नियम सांगतो की, जर तुम्ही जुन्या नियोक्त्यासोबत 4.5 वर्षे सतत काम केले असेल, तर दुसरी नोकरी मिळाल्यावर तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची संपूर्ण रक्कम नवीन नियोक्त्याच्या खात्यात ट्रान्सफर करू शकता. नवीन पीएफ खाते उघडल्यानंतर कर्मचाऱ्याने जुन्या खात्यातून पैसे (Money) काढले, तर त्यालाही प्राप्तिकर कायद्यात सूट देण्यात आली असून या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

1. पीएफ खात्यात विलीन करणे महत्त्वाचे

जेव्हा तुम्ही नवीन नोकरीत (Job) रुजू होता तेव्हा तुम्हाला EPFO ​​(कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था) कडून युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) प्राप्त होतो. तुमचा नियोक्ता या UAN अंतर्गत पीएफ खाते उघडतो, तुम्ही आणि तुमची कंपनी दोघेही दरमहा त्यात योगदान देता. जेव्हा तुम्ही नोकरी बदलता, तेव्हा तुम्ही तुमचा UAN नवीन नियोक्त्याला देता, जो नंतर त्याच UAN अंतर्गत दुसरे PF खाते उघडतो. तुमचे पूर्वीचे पीएफ खाते नंतर उघडलेल्या नवीन खात्यात विलीन करणे आवश्यक आहे.

2. कर कधी भरावा लागतो?

जर तुमच्या पीएफ खात्यातून ५ वर्षांनंतर पैसे काढले गेले तर ते पूर्णपणे करमुक्त आहे. जर तुम्ही ५ वर्षापूर्वी पैसे काढले तर ते करपात्र होते. 5 वर्षापूर्वी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढल्यास आणि ग्राहकांचे पॅन कार्ड लिंक केले नसल्यास 20 टक्के कपात केली जाईल. दुसरीकडे, जर तुमचे पीएफ खाते पॅनशी जोडलेले असेल, तर 10% दराने टीडीएस कापला जाईल.

3. या लोकांना कर भरावा लागणार नाही

जर कर्मचाऱ्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे नोकरी सोडावी लागली असेल किंवा कंपनी बंद झाली असेल किंवा कर्मचाऱ्याच्या नियंत्रणाबाहेरच्या कोणत्याही कारणाने नोकरी गेली असेल तर अशा परिस्थितीत पीएफमधून पैसे काढल्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर कर्मचार्‍याने नोकरी बदलली असेल आणि जुन्या खात्यातून नवीन नियोक्त्याने उघडलेल्या पीएफ खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर या प्रकरणात देखील त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT