Income Tax Return Verification google
बिझनेस

Income Tax Return: करदात्यांसाठी मोठी बातमी! ITR भरला पण हे काम विसरलात? लगेचच पूर्ण करा प्रोसेस, शेवटची तारिख आली समोर

ITR E-Verification Deadline : आयटीआर फाइल केल्यावर काही प्रोसेस पूर्ण कराव्या लागतात. जर तुम्ही त्या प्रोसेस अपूर्ण ठेवल्यात तर तुमचा रिटर्न अवैध ग्राह्य धरला जाऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक करदात्याला आयटीआर फाइल करावा लागतो. आयटीआर फाइल (income tax return) केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपली प्रोसेस पूर्ण झाली आहे. पण त्यानंतर ई-व्हेरिफिकेशन करणं खूप महत्वाचं असतं. काही वेळा तांत्रिक अडचणी, वैयक्तिक कारणे किंवा माहिती नसल्यामुळे करदाते याच्या अंतिम तारखेपर्यंत प्रोसेस पूर्ण करत नाहीत. अशाच करदात्यांसाठी पुन्हा एकदा ई-व्हेरिफिकेशनची संधी देण्यात आली आहे. तसेच याची अंतिम मुदतही देण्यात आली आहे.

तुम्ही आयटीआर फाइल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करायचं असतं. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही की, संबंधित रिटर्न अवैध मानला जातो. त्यामुळे करदात्याला परतावा (Refund) मिळायला अनेक दिवस वाट पाहावी लागते किंवा करासंबंधित अडचणींना सामोरं जावं लागतं.

सध्याच्या काही प्रकरणात करदात्याने मुदत चुकवल्यानंतर योग्य कारण सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी समस्येचा विचार करून ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करण्याची आणखी एक संधी दिली आहे. याचा सर्व करदात्यांनी पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.

तज्ज्ञांच्या मते, ई- व्हेरिफिकेशनची मुदत चुकल्यावर करदाते कंडोनेशन रिक्वेस्ट (Condonation Request) च्या मदतीने मुदत वाढीची मागणी करावी लागते. तसेच तुम्हाला या प्रोसेसला उशीर झाला असेल आणि त्याचं कारण योग्य वाटत असेल तरच आयकर विभाग मागणी मान्य करतं.

करदात्यांनी आयकर रिटर्न भरल्यानंतर त्याचे ई-व्हेरिफिकेशन तातडीने पूर्ण करणे गरजेचं आहे. ही प्रोसेस सोपी असते. आधार ओटीपी, नेट बँकिंग किंवा ईव्हीसीच्या माध्यमातून ही प्रोसेस ऑनलाइन पद्धतीने झटक्यात करता .येते. वेळेवर ई-व्हेरिफिकेशन केल्यावर रिटर्न प्रक्रिया आणि परतावा मिळण्याची प्रक्रिया जास्त वेगाने पूर्ण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malshej Ghat Closed : माळशेज घाट वाहतुकीसाठी आजही बंद; पर्यटकांचे अतोनात हाल, पर्यायी मार्ग कोणते?

Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा कटलेट; वाचा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT