ITR Filling Google
बिझनेस

Income Tax Return: आयटीआर भरताना 'ही' चूक अजिबात करू नका, अन्यथा भरावा लागणार मोठा दंड

Never make 'this' mistake while filing ITR: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना नेहमी योग्य माहिती भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही आयटीआरमध्ये चुकीची माहिती भरली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

Siddhi Hande

प्राप्तीकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख जाहीर केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे. यावर्षी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. ३१ जुलैनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकता. आयटीआर अर्ज भरताना नेहमी तुमची अचूक माहिती भरावी. परतावा भरताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरु नये. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

अनेक कर्मचारी HRA वर सूट मिळवण्यासाठी चुकीची माहिती भरतात. खोट्या पावत्या तयार करुन घेतात. मात्र, यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आयकर विभागाने करदात्यांना ही कामे न करण्याचा इशारा दिला आहे.

करदात्यांनी आयटीआर फाइल करताना नेहमी अचून माहिती भरावी, याबाबत आयकर विभाग नेहमी माहिती देत असते. जर तुम्ही चुकीची माहिती भरती तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

मागील वर्षी २०० टक्क्यांपर्यंत दंड ठोठावला

मागील वर्षी २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात अनेक कर्मचाऱ्यांनी आयकर फाइल करताना चुकीची माहिती भरली होती. त्यामुळे त्यांच्याकडून दंड आकारला गेला होता. जर तुम्ही भरलेली चुकीची माहिती असल्याचे आयकर विभागाच्या लक्षात आले तर त्यांच्याकडून २०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. त्याचसोबत त्या व्यक्तीस तुरुंगातही जावे लागू शकते.

आयटीआर फाइल करताना योग्य ती माहिती भरावी. आयटीआर वाचवण्यासाठी तुम्ही केलेले सर्व दावे खरे असणे गरजेचे आहे. आयटीआर भरल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यात जर काही चुकीचा व्यव्हार झाला असल्याचे निदर्शनास आले तर त्या व्यक्तीला दंड भरावा लागू सकतो. त्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या तीव्रतेनुसार दंड ठरवला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT