CNG Price Increases: महाराष्ट्रात इंधनाचे नवे दर जाहीर, सीएनजीच्या दरात वाढ; पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव काय? जाणून घ्या...

Petrol Diesel And CNG Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र, सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
CNG Price Increases
CNG Price IncreasesSaam Tv

राज्यात पेट्रोल डिझेलचे रोज नवीन दर जाहीर होत असतात. राज्यात आज पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. परंतु सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. जवळपास सीएनजी दर १.५० रुपयांनी महागले आहे.

आजपासून सीएनजीचे नवे दर लागू होणार आहे. १ किलो सीएनजीसाठी तब्बल ७८ रुपये मोजावे लागणार आहे. सीएनजीचे आधीचे दर ७३ रुपये ५० पैसे होते. हेच दर आता वाढले आहेत. तर PNG चे आधीचे दर ४७ रुपये होते. आता ते दर वाढून ४८ रुपये झाले आहेत. (CNG Prices Increases)

मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक वाहने ही सीएनजी गॅसवर चालतात. जवळपास ५ लाखांहून अधिक खासगी वाहने सीएनजीवर चालतात.तर टॅक्सीदेखील ७० हजारांहून अधिक आहे. ऑटो ४ लाखांहून अधिक आहेत.जवळपास २ हजार ३०० हून अधिक बस सीएनजी गॅसवर चालतात. त्यामुळे आता वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. एकूण १० लाखांहून अधिक वाहने सीएनजीवर चालतात.

CNG Price Increases
Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव

राज्यात पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत १०४,५१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०२ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४८ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.१४ रुपये तर डिझेलची किंमत ९०.७० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.१७ रुपये प्रति लिटर आहे.

CNG Price Increases
Reliance Jio New Plans: जबरदस्त! रिलायन्स जिओने युजर्ससाठी आणले 3 नवीन प्लॅन, जाणून घ्या फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com