Income Tax Return Saam Tv
बिझनेस

Income Tax Return: करदात्यांच्या कामाची बातमी! आयकर विभागाने जारी केले नवीन ITR फॉर्म; तुमच्यासाठी कोणता योग्य?

Income Tax Return New Forms for 2026-27: आयकर विभागाने २०२६-२७ साठी नवीन आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार फॉर्म भरायचा आहे.

Siddhi Hande

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी

नवीन आयटीआर फॉर्म जारी

तुमच्या उत्पन्नानुसार कोणता आयटीआर फॉर्म योग्य?

उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नवीन आर्थिक वर्षात नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. या नवीन कायद्यामुळे करदात्यांना फायदा होणार आहे. आयकर कायद्यात अनेक गोष्टी खूप सोप्या भाषेत समजवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म जारी केले आहेत.

आयकर विभागाने ITR-1 ते ITR-7 फॉर्म जारी केले आहे. जर तुम्ही करदाते आहात तुम्हाला आयटीआर भरायचा असेल तर ही माहिती तुम्हाला माहिती असायलाच हवी

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर निर्धारण हे आयकर कायदा १९६१ अंतर्गत होणार आहे. त्यामुळे या वेळी इन्कम टॅक्स फॉर्ममध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म (ITR Form)

ITR-1: आयटीआर १ हा फॉर्म त्यांच्यासाठी आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे. याअंतर्गत सॅलरी, पेन्शन,घर, व्याज या सर्व गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्हाला ₹1.25 पर्यंत लाँग कॅपिटल गेन मिळाले असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरु शकतात.

परदेशात संपत्ती असणाऱ्यांसाठी आयटीआर फॉर्म

ITR-2: जर तु्म्ही आयटीआर १फॉर्मअंतर्गत बसत नाही आणि तुमचा बिझनेसदेखील नाहीये तर तुम्ही हा फॉर्म भरु शकतात. यामध्ये शेअर किंवा प्रॉपर्टी विकून येणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश आहे. याचसोबत परदेशातून मिळवलेल्या संपत्ती असलेल्या नागरिकांसाठी हा फॉर्म आहे.

बिझनेससाठी आयटीआर फॉर्म

ITR-3: हा फॉर्म HUF साठी आहे. ज्यांचा बिझनेस आहे आणि टर्नओवर ५० लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हा आयटीआर फॉर्म आहे.

ITR-4

ITR-4 हा फॉर्म ज्यांच्यासाठी आहे ज्या व्यापारांचे उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे. जे लोक प्रिजम्प्टिव टैक्सेशन स्कीम (धारा 44AD, 44ADA) निवडतात. यामध्ये तुम्हाला टर्नओवरच्या रक्कमेवर एका निश्चित स्वरुपत टॅक्स द्यावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'नाफेड'कडून कांदा खरेदी नाहीच, कांदा खरेदीची घोषणा कागदावरच

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

Pune Bribe Case : महसूल विभागात खळबळ! पुण्यात बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Gautami Patil Photos : दिसतीया भारी, नेसुनी साडी; काळजाचं पाणी पाणी, करतीया पोर ही...

पडद्यावर साधी, खऱ्या आयुष्यात बोल्ड! 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवा लूक पाहून फॅन्स झाले घायाळ

SCROLL FOR NEXT