Income Tax Rebate: आयटीआर भरण्याची वेळ जवळ आली की अनेक करदात्यांना किती टॅक्स भरायचा, कोणती करप्रणाली निवडायची आणि कुठे कर सवलत मिळू शकते, असे प्रश्न पडतात. योग्य नियोजन केल्याने कराचं ओझं कमी करता येऊ शकतं. त्यामध्ये कलम ८७A आणि नवीन करप्रणालीतल्या रिबेट करदात्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते.
नवीन करप्रणालीमध्ये पात्र करदात्यांना १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर मिळणाऱ्या कर सवलतीचा फायदा होऊ शकतो. या रिबेटची मर्यादी ६०,००० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न पात्र मर्यादेत असेल, तर टॅक्सची रक्कम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र ही सवलत प्रत्येक प्रकारच्या उत्पन्नावर लागू होत नाही. यात विशेष दराने कर आकारल्या जाणाऱ्या उत्पन्नासाठी वेगळे नियम लागू होऊ शकतात.
जुन्या करप्रणालीत कलम 87A अंतर्गत पात्र करदात्यांना ₹5 लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर मिळणाऱ्या कराची रिबेट मिळू शकते. त्यामुळे पात्र व्यक्तीची करदेयता शून्य होऊ शकते. मात्र उत्पन्न मर्यादा ओलांडल्यावर रिबेटचा फायदा मिळण्याचे नियम बदलतात. त्यामुळे ITR दाखल करण्याआधी तुमचे करपात्र उत्पन्न अचूकपणे मोजणे महत्त्वाचे आहे.
तुमचे उत्पन्न १२ लाखांच्या मर्यादेपेक्षा थोडं जास्त असेल तर Marginal Relief महत्त्वाची ठरू शकते. या तरतुदीमुळे मर्यादा किंचित ओलांडल्यामुळे टॅक्समध्ये अचानक मोठी वाढ होऊ नये, यासाठी दिलासा मिळू शकतो.
सर्वात आधी तुमचे वर्षभराचे एकूण उत्पन्न मोजून घ्या. त्यानंतर लागू असलेल्या वजावटी आणि सवलती लक्षात घेऊन करपात्र उत्पन्न ठरवून घ्या. योग्य करप्रणाली निवडून ITR मध्ये आवश्यक माहिती भरा आणि पात्र असल्यास संबंधित रिबेटचा दावा करा.
महत्त्वाचे:कराचे नियम उत्पन्नाचा प्रकार आणि करप्रणाली यानुसार बदलू शकतात. त्यामुळे ITR दाखल करण्याआधी आयकर विभागाच्या ताज्या नियमांनुसार तुमची पात्रता तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.