ICICI Bank FD Rates Hike News  AI Image
बिझनेस

ICICI बँकेची दिवाळीपूर्वी मोठी घोषणा! FD च्या व्याजदरात वाढ, कोणत्या मुदत ठेवीवर किती व्याज मिळणार? वाचा

ICICI Bank New FD Rates Update News : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD चे नवीन व्याजदर जाहीर. कोणत्या मुदतीच्या ठेवीवर किती व्याज मिळणार? वाचा सविस्तर.

Alisha Khedekar

  • ICICI बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD वरील निवडक व्याजदरात वाढ केली

  • काही ठराविक मुदतींच्या FD वर १० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली

  • ज्येष्ठ नागरिकांना पात्र FD वर कमाल ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार

दिवाळीपूर्वी ICICI बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेने FD च्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. काही ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात ०.१० टक्क्यांनी म्हणजेच १० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एफडीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना एफडीवर जास्तीत जास्त ६.६० टक्के व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ७.२० टक्क्यांपर्यंत आहे असे बँकेने म्हटले आहे.

कोणत्या एफडीवर किती व्याज मिळणार?

ICICI बँकेने २ वर्ष १ दिवस ते ३ वर्षांच्या एफडीवर व्याजदर ६.४५ टक्क्यांवरून ६.५५ टक्के केला आहे. तर ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षांच्या मुदतीसाठी व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६०.६० टक्के करण्यात आला आहे. याशिवाय ५ वर्षे १ दिवस ते १० वर्षांच्या FD वरही आता ६.६० टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी हा दर ६.५० टक्के इतका होता. ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हर एफडीच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सामान्य ग्राहकांना ६.६० टक्के तर, ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के व्याज मिळणार आहे.

कमी कालावधीच्या एफडीवर किती व्याज?

तसेच ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर २.७५ टक्के, ४६ ते ९० दिवसांसाठी ४ टक्के आणि ९१ ते १८४ दिवसांसाठी ४.५० टक्के व्याज मिळेल. १८५ दिवस ते १ वर्षांपेक्षा कमी एफडीवर ५.५० टक्के व्याज दिले जाईल. १ वर्ष ते १८ महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी ६. २५ टक्के, तर १८ महिने ते २ वर्षांसाठी ६.३० टक्के व्याज मिळेल

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदा

ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सामान्य ग्राहकांपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरू शकते. मात्र, एफडी करण्यापूर्वी बँकेचे अधिकृत व्याजदर, अटी आणि मुदत नक्की तपासून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई! कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये कमी मतदार नोंदणीसाठी पक्षातील काही नेते जबाबदार, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Ratnagiri Water Stock : रत्नागिरीकरांनो, पाण्याची चिंता मिटली! पुढील ५ महिने टेन्शन नाही, धरणांमध्ये किती साठा?

Real vs Fake Honey: तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

Ind vs NZ : भारताच्या वनडे संघात पुन्हा बदल; ताज्या दमाच्या तेजतर्रार गोलंदाजाची एन्ट्री, बाहेर कोण अन् कसा असेल संघ?

SCROLL FOR NEXT