Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, चारवेळा अपयश; लग्नानंतर क्रॅक केली UPSC; IAS संजीता महापात्रा यांचा प्रवास

Success Story of IAS Sanjita Mohapatra: आयएएस संजिता महापात्रा यांना सलग चार वेळा यूपीएससी परीक्षेत अपयश मिळाले. त्यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा दिली.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा आपल्याला स्वप्ने बाजूला ठेवून घर सांभाळावे लागते. मुलींना त्यांच्या सासरी सर्वकाही आपल्या मनासारख करता येत नाही. परंतु अशीही काही उदाहरणे आहेत की, ज्यात स्त्रियांना त्यांच्या सासरच्या कुटुंबाने खूप सपोर्ट केला. असंच एक व्यक्तित्तव म्हणजे आयएएस संजीता महापात्रा.

संजीता महापात्रा यांचा संघर्ष (IAS Sanjita Mohapatra)

संजीता महापात्रा यांनी खूप संघर्षातून यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे. सलग अपयश येऊनदेखील त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. चार वेळा अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस पदी काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले.

IIT कानपूरमधून इंजिनियरिंग

संजीता महापात्रा या मूळच्या ओडिशाच्या राउरकेला येथील रहिवासी. त्या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांनी ओडिशा येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मॅकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये डिग्री प्राप्त केली. त्यांनी आयआयटी कानपूरमधून इंजिनियरिंग पूर्ण केले.

संजिता यांनी कॉलेज झाल्यावर यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी पहिल्या तीन प्रयत्नात अपयश मिळाले. त्यानंतर त्यांनी निराश होऊन एका प्रायव्हेट कंपनीत काम केले. त्यानंतर नोकरी करता करता त्यांनी चौथ्यांदा परीक्षा दिली. त्यातही त्यांना अपय़स मिळाले.

संजिता यांनी पुन्हा एका यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी अभ्यासासाठी नोकरी सोडली होती. याच काळात त्यांचे लग्न झाले. परंतु लग्नानंतरही त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सासरच्यांनी त्यांना खूप सपोर्ट केला. २०१९ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत १वी रँक प्राप्त केली. त्यांची पती रिझर्व्ह बँकेत मॅनेजर पदावर काम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंडिया आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांचे नेते; 'या' ५ मुद्द्यांवर झाले एकमत, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची एकमुखाने मागणी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये वादळी वारा पावसाने डाळिंब बागेला फटका

IND vs AFG: १ डाव आणि ३०० रन्स! अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर

शक्तिपीठ महामार्गावरून राजकारण तापलं; समर्थक-विरोधक आमने-सामने; कोल्हापूरात मोठा गोंधळ

मार्कशीटच नाही, लिव्हिंगही नाही! मराठी शाळेतील नववी, दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

SCROLL FOR NEXT