Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Success Story Of IAS Mayank Tripathi: आयएएस मयंक त्रिपाठी यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास केला. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

IAS मयंक त्रिपाठी यांचा प्रेरणादायी प्रवास

दिवसा नोकरी अन् रात्री UPSC चा अभ्यास

दोनदा क्रॅक केली UPSC

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. परंतु कधीकधी परिस्थिती खूप बिकट असते. या परिस्थितीतून तुम्हाला मार्ग काढत यश मिळवायचे असते. असंच यश मयंक त्रिपाठी यांनी मिळवलं. दिवसाचा नोकरी अन् रात्री अभ्यास करुन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

IAS होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं

मयंक त्रिपाठी यांचे आयएएस (IAS) अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यांनी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत १०वी रँक प्राप्त केली.

मयंक त्रिपाठी हे मूळचे उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील रहिवासी. त्यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. परंतु त्यांचे सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न होते.

दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास

मयंक यांनी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमीशनची परीक्षा दिली. परंतु त्यांचे स्वप्न आयएएस होण्याचे होते. यामुळेच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. दिवसा नोकरी आणि रात्री यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला.

२०२३ मध्ये मयंक यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली. त्यावेळी त्यांना आयआरएस पोस्ट मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०२४ मध्ये परीक्षा दिली. यावेळी त्यांनी १०वी रँक प्राप्त केली. त्यांनी आपल्या मेहनतीवर हे यश मिळवले आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. परिस्थिती कशीही असली तरीही त्यातून तुम्ही मार्ग काढू शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली विमानतळावर भीषण दुर्घटना; दोन विमानांची पंख एकमेकांना धडकली

Female Behaviour After Breakup: सोशल मीडिया 'स्टॉकिंग' ते शॉपिंग; ब्रेकअपनंतर मुली नेमकं काय काय करतात?

Maharashtra News Live Update: “नाव सेवाग्राम पण थांबा नाही”; खासदार अमर काळे यांच्याकडून खंत व्यक्त

Nagpur Summer Tourism: नागपूरजवळची 'ही' थंड हवेची ठिकाणं माहितीयेत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा पाहाच...

काँग्रेसची मोठी कारवाई, ५ आमदार तडकाफडकी निलंबित; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT