Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सिंगापूरमधील नोकरी सोडली,मित्राच्या यशाने प्रेरित होऊन मायदेशी परतला; पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अक्षय अग्रवाल यांचा प्रवास

Success Story Of IAS Akshay Agarwal: आयएएस अक्षय अग्रवाल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी सिंगापूरमधील नोकरी सोडून भारतात येऊन स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांचे प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा असते.अनेकांना यूपीएससी परीक्षेत अपयश मिळते. फार कमी लोक आहेत ज्यांना पहिल्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षा क्रॅक करतात. असंच काहीसं अक्षय अग्रवाल यांच्यासोबत झालं. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

अक्षय अग्रवाल यांनी सिंगापूरमधील नोकरी सोडली. परदेशातील नोकरी सोडली आणि भारतात परतले त्यानंतर यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)

२०१८ मध्ये अक्षय अग्रवाल परतले. त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. अक्षय यांच्या मित्राने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. त्यांच्या मित्राच्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी त्यांची खूप साथ दिली. त्यांनी नोकरी सोडली अन् यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्याचे स्वप्न मनात घेऊन भारतात परतला.

अक्षय यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सिंगापूरच्या नॅशनल यूनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडल मिळवले. त्यांनी कॉर्पोरेटमध्येही काम केले. नोकरी करताना ते आठवड्याला ४० तास अभ्यास करायचे. (Success Story Of IAS Akshay Agarwal)

त्यांनी सात महिने काम आणि अभ्यास केला. त्यानंतर शेवटी त्यांनी नोकरी सोडली आणि दिवसातून १२ तास अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी खूप मेहनतीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.त्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास केला. त्यांनी मागील २० ते २५ वर्षांचया यूपीएससीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी वेळापत्रक आखलं आणि यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT