HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: मुदत संपली! अजूनही लाखो वाहनधारकांनी HSRP नंबरप्लेट बसवली नाही; दिवसाला किती दंड भरावा लागणार?

HSRP Number Plate Deadline Over: राज्यातील वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला रोज दंड भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

HSRP नंबरप्लेट बसवण्याची मुदत संपली

नंबरप्लेट न बसवल्यास बसणार दंड

परिवहन विभाग करणार कारवाई

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर नंबरप्लेट बसवली नाही तर वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आता एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांना दंड भरावा लागणार आहे. परिवहन विभाग या वाहनचालकांवर कारवाई करणार आहे.

उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत होती. मुदत उलटून दोन महिने झाले तरीही अर्ध्यापेक्षा जास्त वाहनांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. या वाहनांवर कालपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील १ कोटी २ लाख २८ हजार वाहनांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८८ लाख ३० हजार वाहनांनी नंबरप्लेट बसवली आहे. फक्त ४९ टक्के वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यापैकी ४२ टक्के वाहनधारकांनी प्रत्यक्ष नंबरप्लेट बसवली आहे. अजूनही लाखो वाहनांनी रजिस्ट्रेशन केले आहे. या वाहनांना दंड भरावा लागणार आहे.

किती दंड भरावा लागणार? (HSRP Number Plate Penalty)

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुदतीपूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनचालकांना नंबरप्लेट बसवण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. या मुदतीनंतर अपॉइंटमेंट घेतलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे.आता ही कारवाई सुरु झाली आहे. वाहनचालकांना १००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केले नाही त्यांनी लवकरात लवकर हे काम करा. अन्यथा तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT