वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांविरुद्ध धुळे जिल्ह्यामध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान नियमांचं उल्लंघन आढळलं तर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अजून HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
वाहनांची अचूक ओळख पटवणं, बनावट नंबर प्लेटचा वापर थांबवणं आणि वाहनांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालणं, या उद्देशाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी महत्त्वाची मानली जाते. नवीन वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. जुन्या वाहनांनाही HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. पुढे मुदतवाढीनंतरही काही वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसविलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन केलं की, नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
HSRP नंबर प्लेटच्या नियमांचं पालन केलं नाही तर वाहनधारकांना फक्त दंडात्मक कारवाईचाच सामना करावा लागणार नाही, तर वाहनाशी संबंधित काही महत्त्वाची कामेही अडचणीत येऊ शकतात. प्रमाणित HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचे मालकी हस्तांतरण आणि पत्ता बदल यांसारख्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं महत्त्वाचं आहे.
वाहनधारकांनी आपल्या वाहनाला HSRP नंबर प्लेट बसविण्यात आली आहे की नाही, याची खात्री करा. नंबर प्लेट अद्याप बसवलेली नसल्यास अधिकृत माध्यमातून तिची नोंदणी आणि बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
तसेच नियम, लागू मुदती आणि दंडासंदर्भातील अधिकृत सूचनांची माहिती संबंधित परिवहन विभागाकडून घ्या. HSRP नंबर प्लेट ही वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने वाहनधारकांनी या नियमाकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.