HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: लाखो वाहनधारकांनी HSRP नंबरप्लेट बसवलीच नाही, आता फक्त शेवटचे ३ दिवस; मुदतवाढ मिळणार का?

HSRP Number Plate Installment Deadline Extended : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. अजूनही लाखो वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे यासाठी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी उरले शेवटचे ३ दिवस

नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ मिळणार का?

अजूनही लाखो वाहनधारकांनी बसवली नाही नंबरप्लेट

राज्यातील सर्व वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटचे ३ दिवस उरले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. दरम्यान, आता यासाठी अजून मुदतवाढ देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची मुदतवाढ मिळणार का? (HSRP Number Plate Installment Deadline May Be Extended)

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये पुण्यात फक्त ५० हजार वाहनांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. फक्त पुण्यात १६ लाख वाहनधारकांनी अजूनही नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे १६ लाख वाहनधारक नंबरप्लेट कधी बसवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, १६ लाख वाहनांना ३ दिवसात नंबरप्लेट बसवणे शक्य नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. त्यानंतरच्या वाहनांना आधीच ही नंबरप्लेट बसवली होती. त्यामुळे या बाकीच्या वाहनधारकांची हे काम लगेच करायचे आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे गरजेचे का? (Why HSRP Number Plate Mandatory)

अपघात किंवा गुन्ह्यातील वाहनांना सहजासहजी पकडता यावे, यासाठी ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे वाहन सुरक्षित असावे यासाठी ही युनिक नंबरप्लेट दिली जात आहे. या नंबरपल्टेमुळे गुन्हेगारांना सहज शोधता येईल, असं सांगितलं जात आहे.

HSRP नंबरप्लेट न बसवल्यास भरावा लागणार दंड (If you not install HSRP Plate then Pay Fine)

डिसेंबरमध्ये पुण्यातील फक्त ५० हजार वाहनधारकांनी नंबरप्लेटसाठी अर्ज केला होता. हा वेग खूप कमी आहे. त्यामुळे अजून खूप वेळ लागू शकते. दरम्यान,जर नंबरप्लेट बसवली नाही तर १०,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. यामुळेच आता मुदतवाढ मिळणार की दंड भरावा लागणार, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कणकवलीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला पुन्हा धक्का

Highest Mileage Cars: भारतात विकल्या जाणारी सगळ्यात जास्त मायलेजची कार कोणती?

Back Acne Skin: पाठीवरच्या पिंपल्समुळे त्रस्त आहात? या 5 सोप्या टिप्स करा फॉलो

Young Heart Attack: दररोज ५ किमी धावतो, ना सिगारेट ना फास्टफूड, तरीही हृदयात २ स्टेंट्सची गरज, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक

Hardik Pandya: भर मैदानात राडा! हार्दिक पंड्या-मुरली कार्तिकमध्ये जोरदार भांडणं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

SCROLL FOR NEXT