How to Use DeepSeek  Saam Tv
बिझनेस

DeepSeek स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्ये कसं वापरावं? सामन्यांसाठी कसं आहे फायद्याचं?

How to Use DeepSeek: चायनीज AI मॉडेल DeepSeek AI ने तंत्रज्ञान प्रेमी आणि डेवलपर्सचं लक्ष वेधून घेतलंय. डीपसीकचा वापर कसा करावा, ते कसं आहे, याबाबतची माहिती आयटी तज्ञ अतुल कहाते यांनी दिलीय.

Bharat Jadhav

चीनच्या एआय स्टार्टअपच्या DeepSeek ची चर्चा जगभरात होतेय. या कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या जगात मोठी खळबळ उडवून दिलीय. OpenAI चे ChatGPT ला सुद्धा DeepSeek ने मागे सोडलंय. ChatGPT ला मागे टाकून DeepSeek R1 अमेरिकन ऍपल ॲप स्टोअरवर नंबर-1 बनल असून सर्वाधिक डाउनलोड झालेलं हे ॲप बनले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात हे एक उत्तम पाऊल आहे जे आता युझर्सच्या पसंतीस उतरले आहे. दरम्यान डीपसीकचा फायदा काय, कसा उपयोग करून घ्यायचा याबाबत आयटी तज्ञ अतुल कहाते यांनी सामशी बोलताना माहिती दिलीय.

डीपसीकच्या वापराबाबत आयटी तज्ञ अतुल कहाते म्हणाले, ओपन आय कंपनीचं ChatGPT, गुगल कंपनीचं Gemini आणि Claude AI यांचा वापर करायचा असला तर आपल्याला पैसे भरावे लागतात. म्हणजेच हे पेड सॉफ्टवेअर आहेत. चॅटपीटीचा वापर आपण फुकटात करतो. पण इतर कंपन्यांना त्याचा वापर करायचा म्हटलं तर पैसे भरावे लागतात. तर फेसबूक कंपनीचं लामा हे चॅटबॉट फ्रीमध्ये आहे, म्हणजेच हो ओपन सोर्स म्हटलं जातं. डीपसीकदेखील ओपन सोर्स आहे. हेच मोठं कारण आहे, हे अॅप सर्वाधिक लोकप्रिय होण्यामागे आहे.

DeepSeek R1 हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) द्वारे परवानाकृत मुक्त-स्रोत AI मॉडेल आहे. हे मॉडेल संशोधनासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी वापरले जाऊ शकते. तुमच्या कॉम्प्युटरवर DeepSeek वापरायचे असल्यास तुम्ही ते इन्स्टॉल आणि सेटअप करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.

ऑपरेटिंग सिस्टम:

Windows 10 किंवा नंतरचे

macOS 10.15 किंवा नंतरचे

लिनक्स (Ubuntu 18.04 किंवा नंतरचे)

हार्डवेअर आवश्यकता

CPU: क्वाड-कोर किंवा उत्तम प्रोसेसर

GPU: उच्च-कार्यक्षमता GPU (NVIDIA CUDA समर्थन आवश्यक)

रॅम: किमान 8GB (16GB किंवा अधिक)

स्टोरेज: किमान 50GB मोकळ्या जागेसह SSD

डाउनलोड आणि इंस्टॉलेशन (विंडोज):

दरम्यान DeepSeek R1 चे अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत, ज्याची क्षमता 1.5 अब्ज ते 70 अब्ज पॅरामीटर्सपर्यंत आहे. हे अॅप घेण्यासाठी ओलामाच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि विंडोज इंस्टॉलर डाउनलोड करा. इंस्टॉलर चालवा आणि सूचनांचे पालन करा.

मॅक युझर्स कसे वापरू शकतात

ओल्लामाच्या वेबसाइटवरून इंस्टॉलर डाउनलोड करा.

तुम्ही खालील आदेशासह Homebrew वापरूनही इन्स्टॉल करू शकता.

DeepSeek कसे वापरावे

टर्मिनल उघडा (विंडोज/मॅक) आणि ही कमांड द्या.

ollama रन deepseek-r1:8b त्यानंतर एंटर बटन दाबा. त्यानंतर DeepSeek R1 सुरू होईल आणि तुम्ही टर्मिनल इंटरफेसद्वारे मॉडेलशी संवाद साधू शकता.

वेबवर DeepSeek वर कसं वापरणार

तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे नसल्यास, तुम्ही ते वेबवर ऍक्सेस करू शकता.

वेबसाइटला भेट द्या: https://chat.deepseek.com/sign_in

ईमेल आयडी/नंबर किंवा Google खाते वापरून नोंदणी करा.

मोबाईलवर DeepSeek कसे वापरावे

Apple App Store वर DeepSeek ॲप उपलब्ध आहे.

आयफोनवर ॲप स्टोअर उघडा.

DeepSeek शोधा आणि स्थापित करा.

ईमेल आयडी आणि पासवर्ड सेट करून ॲपमध्ये नोंदणी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT