WhatsApp Suspends 9.8 Million Indian Accounts to Curb Spam, Fake News, and Abuse 
बिझनेस

WhatsApp : आता व्हॉट्सअपवरून कमाई होणार, जाणून घ्या हे मार्ग

WhatsApp Earning : व्हॉट्सअ‍ॅप फक्त चॅटिंगसाठी नव्हे तर कमाईसाठीही मोठे साधन ठरते. एफिलिएट मार्केटिंग, पेड ग्रुप्स, रेफरल्स आणि बिझनेस अकाउंटद्वारे घरबसल्या चांगली कमाई करता येते.

Sakshi Sunil Jadhav

व्हॉट्सअ‍ॅप आता फक्त चॅटिंग आणि कॉलिंगसाठी मर्यादीत अ‍ॅप राहिलेले नाही, तर अनेकांसाठी कमाईचे एक मोठे साधन बनले आहे. यामध्ये तुम्ही घरी बसून लोक व्हॉट्सअॅपच्या मदतीने व्यवसाय उभारू शकता. चांगला नफा मिळवू शकता. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्हीदेखील या यादीत सामील होऊ शकता.

सगळ्यात आधी एफिलिएट मार्केटिंग हा व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे कमावण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. यामध्ये फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्यांच्या कार्यक्रमासाठी नोंदणी करून त्यांच्या उत्पादनांच्या लिंक्स आपल्या ग्रुप किंवा स्टेटसवर शेअर करता येतात. जेव्हा कोणी या लिंकवरून खरेदी करतो, तेव्हा ठराविक कमिशन मिळते.

तसेच, अनेकजण पेड व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करूनही कमाई करता येते. जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात खास छंद असेल तर तुम्ही एक कम्युनिटी तयार करून सदस्यांकडून सबस्क्रिप्शन फी आकारू शकता. सदस्यांना विशेष माहिती, सल्ला किंवा मार्गदर्शन देऊन हे ग्रुप्स यशस्वीपणे चालवले जातात.

अनेक अ‍ॅप्स रेफरल्सद्वारेही पैसे कमवण्याची संधी देतात. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना रेफरल लिंक पाठवली आणि त्यांनी ती वापरून अॅप डाउनलोड केले तर तुम्हाला रिवॉर्ड मिळतो. हा मार्गही सहज आणि लोकप्रिय आहे. जर तुम्ही स्वतः काही उत्पादन तयार करत असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाउंटद्वारे ते विकण्याची संधी उपलब्ध आहे. स्टेटस, ब्रॉडकास्ट मेसेज किंवा ग्रुप्समधून ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचवून विक्री वाढवता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT