Sakshi Sunil Jadhav
भारतात लोक मोठ्या संख्येने चपात्यांचा आहारात समावेश करतात.
गव्हाच्या चपात्या आरोग्यासाठी चांगल्या असतात आणि सहज पचतात.
तुम्ही चपातीला आणखीन पौष्टीक बनवून मुलांच्या डब्याला देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेच जास्तीचे श्रम घ्यावे लागत नाहीत.
तुम्ही अळशीच्या पावडरचा वापर करुन चपात्या तयार करु शकता.
अळशीमध्ये ओमेगा ३ फॅटीअॅसिड असल्याने भरपूर प्रमाणात पोषण तुम्हाला मिळेल.
ओट्स पावडर तुम्ही चपात्यांमध्ये ओट्स पावडर मिक्स करु शकता.
ओट्समध्ये फायबर, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.
गव्हाच्या पीठात मेथीच्या दाण्यांची पावडर सुद्धा फायदेशीर ठरु शकते.
ओवा सुद्धा पराठ्यांमध्ये पुऱ्यांमध्ये घातल्याने पोट फुगण्याची समस्या कमी होते.