प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. प्रत्येक कर्मचारी दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये ठरावीक रक्कम जमा करतात. त्याचसोबत कंपनीकडूनदेखील काही ठरावीक रक्कम दिली जाते. पीएफ अकाउंटमधील पैसे ही एक गुंतवणूक असते.
पीएफ अकाउंटमधील पैशांवर तुम्हाला व्याजदर मिळते. त्यामुळे तुम्ही जे पैसे गुंतवतात त्यावर चांगला परतावा मिळतो. कर्मचारी आपल्या पगारानुसार हे पैसे जमा करतात. हे पैसे दर महिन्याला आपल्या खात्यात जमा होतात की नाही. आपल्याला इंटरेस्ट मिळतो की नाही हे कसं चेक करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (PF Balance Check)
प्रत्येक कर्मचाऱ्याचे यूएएन नंबर असतो. या नंबरवरुनच तुम्ही पीएफ बॅलेंस जमा करु शकतात. परंतु आता तुम्ही यूएएन नंबरशिवायदेखील पीएफ बॅलेंस चेक करु शकतात.
पीएफ बॅलेंस चेक करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल किंवा मेसेज करायचा आहे. यानंतर तुमच्या फोनवर लगेच तुमचा पीएफ बॅलेंसबाबत माहिती मिळेल.
पीएफ बॅलेंस कसा चेक करायचा? (How To Check PF Balance)
तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन ९९६५४४४२५ या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्या. मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमचे शेवटचे योगदान आणि तुमच्या खात्यातील बॅलेन्सबाबत मेसेज येईल. या पद्धतीने तुम्ही पीएफ बॅलेंस चेक करु शकतात.
यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर यूएएन नंबर (UAN Number)सक्रिय असणे गरजेचे आहे. तसेच बँक खाते, आधार नंबर किंवा पॅन नंबर जोडलेला असणे गरजेचे आहे. तुम्ही मिस्ड कॉल दिल्यानंतर कॉल डिस्कनेक्ट होईल. त्यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. (How To Check PF Balance Without UAN Number)
याचसोबत तुम्ही पीएफ बॅलेंस चेक करण्यासाठी ७७३८२९९८९९ या नंबरवर मेसेजदेखील पाठवू शकतात. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरुन EPFOHO UAN ENG हा मेसेज टाइप करा. त्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा ऑप्शन येईल. यानंतर तुमच्या मोबाईलवर पीएफ बॅलेंसचा मेसेज येईल.
याचसोबत तुम्ही उमंग अॅपवरुनदेखील पीएफ बॅलेंस चेक करु शकतात. तुम्हाला फक्त या अॅपमध्ये मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे.त्यानंतर सर्व माहिती मिळेल. (PF Balance Check Process)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.