Voter ID Name Spelling Change Saam Tv
बिझनेस

Voter ID कार्डवर नावाची स्पेलिंग चुकली असेल तर...? घरबसल्या बदलू शकता, या सोप्या स्टेप्स फॉलो करा

Voter ID Name Spelling Change : १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु, मतदान करण्यासाठी तुमचे वोटर आयडी असणे देखील तितकेच महत्त्वाचे. मतदान कार्डवरुन तुमची खरी ओळख पटते.

कोमल दामुद्रे

How To Change Voter ID Name :

१८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु, मतदान करण्यासाठी तुमचे वोटर आयडी असणे देखील तितकेच महत्त्वाचे. मतदान कार्डवरुन तुमची खरी ओळख पटते.

आधार कार्डमुळे मतदान कार्डला सध्या तितकी मागणी नाही. परंतु, हा देखील तितकाच महत्त्वाचा कागदपत्र आहे. यावर तुमचे नाव, जन्मतारीख आणि प्रोफाईल फोटोसोबतच तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता देखील लिहिला असतो. परंतु, यावर तुमच्या नावाची स्पेलिंग चुकली असेल तर?

घाबरु नका, तुमच्या नावात बदल करायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये जाऊन बदलण्याची गरज नाही. यासाठी सरकारने ऑनलाइन (Online) सुविधा आणली आहे. ज्यामुळे तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि तुमच्या नावाची स्पेलिंगही दुरुस्त होईल. जाणून घेऊया कसे

1. मतदार ओळखपत्रावरील नाव कसे दुरुस्त कराल?

जर तुमच्या नावाची स्पेलिंग चुकली असेल किंवा संपूर्ण नाव चुकले असेल तर तुम्ही ऑनलाइन दुरुस्त करु शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्हाला स्मार्टफोन (Smartphone) किंवा लॅपटॉपची मदत घेता येईल. ही सुविधा ऑफलाइन देखील मिळते. तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा वापर देखील करू शकता.

2. मतदान ओळखपत्रातील नाव कसे बदलाल?

  • यासाठी तुम्हाला सर्वात आधी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल http://www.nvsp.in वर जा आणि तेथे लॉग इन करा.

  • यानंतर तुम्ही मतदार यादीतील नोंदणी सुधारणेवर टॅप करा.

  • नवीन पेज उघडल्यानंतर तुम्हाला फॉर्म ८ वर क्लिक करा.

  • या ठिकाणी तुम्ही मतदार कार्ड दुरुस्तीसाठी अर्ज (Application) करु शकता. आवश्यक तपशील प्रविष्ट करुन पुढच्या पर्यायावर क्लिक करा

  • या पेजवर तुम्हाला माय नेम या पर्यायावर टॅप करावे लागेल. तुम्हालामतदार ओळखपत्रात तुमचे नाव बदलावे लागेल.

  • यानंतर तुमचे शहर निवडा. नंतर तुम्हाला तारीख निवडावी लागेल आणि ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सारखे आवश्यक तपशील भरावी लागेल.

  • संपूर्ण माहिती व्यवस्थित दिल्यानंतर सबमिट करुन टॅबवर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT