EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO खात्याचा मोबाईल नंबर बदलायचाय? फक्त या ५ स्टेप्स करा फॉलो; घरबसल्या होईल काम

EPFO Register Mobile Number Change Process: ईपीएफओ खात्याशी प्रत्येक कर्मचाऱ्याचा मोबाईल नंबर रजिस्टर असतो. जर तुम्हाला हा नंबर बदलायचा असेल तर या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत तुमच्या खात्यातून दर महिन्याला ठरावी रक्कम जमा होत असते. यामध्ये काही रक्कम कर्मचाऱ्याच्या अकाउंटमधून दिली जाते तर काही रक्कम ही कंपनी देते. यातील काही रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एकरमी मिळते. तर काही रक्कम ही पेन्शन अकाउंटमध्ये जाते. पीएफ खातेदारांना एक युएएन नंबर दिला जातो. हा नंबर खूप महत्त्वाचा असतो.

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) महत्त्वाचा असतो. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही पीएफ खाते वापरु शकतात. या नंबरमुळेच तुम्हाला खात्यातील बॅलेन्स करतो. तसेच तुमची सर्व माहिती कळते.

ईपीएफओ खात्याशी कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर लिंक असतो. परंतु जर तुम्ही मोबाईल नंबर बदलला असेल किंवा तुम्हाला दुसरा नंबर अॅड करायचा असेल तर तो करु शकतात. नाहीतर तुमच्या पीएफ अकाउंटबाबत सर्व अपडेट तुमच्या जुन्या नंबरवर जातील.यासाठी तुम्हाला ईपीएफ पोर्टल किंवा ईपीएफ खात्यात जाऊन नंबर बदलावा लागणार आहे.

ईपीएफ खात्यात मोबाईल नंबर कसा रजिस्टर करायचा? (How To Register Mobile Number In EPFO Account)

सर्वप्रथम ईपीएफओ पोर्टला भेट द्या. त्यानंतर यूएएन सक्रिय या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर अॅक्टिव्हेट यूएएनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा यूएएन नंबर, आधार नंबर, नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतक ओटीपी आल्यावर Get Authorization PIN वर क्लिक करा. यानंतर सक्रिय करा.

पीएफ अकाउंटमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा? (How To Change Mobile Number In PF Account)

ईपीएफओ पोर्टलवर जाऊन लॉग इन करा. यानंतर यूएएन नंबर आणि पासवर्ड वापरुन रजिस्टर करा. यानंतर संपर्क तपशीलावर क्लिक करा. तिथे मोबाईल नंबर बदला असा ऑप्शन येईल. तो निवडा. त्यानंतर दोनदा मोबाईल नंबर टाका. ओटीपी टाका. यानंतर सबमिट करा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर बदलला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT