Manodhairya Scheme Saam Tv
बिझनेस

Manodhairya Scheme : 'मनोधैर्य' योजना काय आहे? अत्याचार आणि पीडित महिलांना कसा घेता येईल लाभ? वाचा सविस्तर

Manodhairya Scheme For Women : या योजनेत बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यातील महिलांसाठी सरकारने मनोधैर्य योजनेच्या निधी वाढ करण्यात आली आहे. आता यानंतर पीडितांना १० लाख रुपयांची मदत मिळेल.

कोमल दामुद्रे

How To Apply Manodhairya Scheme :

हिवाळी अधिवेशनात महिला धोरण अन्यायाविरुद्ध राज्य सरकारने महिलांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला. बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला तसेच लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी आणि आर्थिक सहाय्यता पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मनोधैर्य योजना राबवण्यात येते.

यामध्ये बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यातील महिलांसाठी सरकारने मनोधैर्य योजनेच्या निधी वाढ करण्यात आली आहे. आता यानंतर पीडितांना १० लाख रुपयांची मदत मिळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांसाठी मनोधैर्य योजना मोठा आधार ठरते. या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या (Government) माध्यमातून पीडितांना आर्थिक (Money) मदत करण्यात येते.

1. अर्ज कसा कराल?

पीडिताला सर्वात आधी एफआयआर अर्ज (Application) करावा लागतो. त्यानंतर न्यायालयासमोर दिलेल्या १६४ च्या जबाबाची प्रत आणि वैद्यकीय पुरावे सादर करुन अर्ज करता येईल.

अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात येते. त्यानंतर अर्जदाराला वैद्यकीय खर्चासाठी तत्काल ३० हजार रुपयांची मदत केली जाते. उरलेली रक्कम मंजूर झाल्यानंतर ती १० वर्षांसाठी अर्जदाराच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येते.

2. पीडिताला मदत कशी मिळते?

सगळ्यात आधी ३० हजार रुपये दिले जातात. त्यानंतर अंतिम रकमेतील २५ टक्के दिले जातात. रक्कम ही रोख स्वरुपात मिळते. ७५ टक्के रकम १० वर्षांसाठी मुदतठेव म्हणून ठेवण्यात येते. दर ३ महिन्यांनी मुदत ठेवीवरील रक्कमेवर व्याज मिळते. दहा वर्षानंतर मुदत ठेवीची रक्कम काढता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ एप्रिलपासून नियम बदलणार; HSRP प्लेट नसेल तर गाडीचे काम अडकणार, ₹१०००० चा दंडही बसणार

CM Resignation : मुख्यमंत्री राजीनामा देणार; दिल्लीत जाणार, बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

नाशिकमध्ये हिंदू तरुणाच्या धर्मांतराचा डाव, आयटी कंपनीतच धर्मांतराच रॅकेट

Maharashtra News Live Update: मुंबई विमानतळ टर्मिनल एक वर लागली आग

VIRAL VIDEO : बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडलं; गर्लफ्रेंड संतापली, भररस्त्यात ऊरावर बसून बुक्क्यांनी हाणलं

SCROLL FOR NEXT