Birth Certificate Online Apply CRSORGI Saam TV Marathi
बिझनेस

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Apply Birth Certificate CRSORGI Online: तुम्ही आता कोणत्याही वयात अगदी जन्म दाखला मिळवू शकता. त्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

Namdeo Kumbhar

Birth Certificate Online Apply CRSORGI : कोणत्याही वयात जन्म दाखला मिळवणे आता सोपे झाले आहे. त्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. dc.crsorgi.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन घरबसल्या जन्म दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

या प्रक्रियेत महत्त्वाचा फरक फक्त कागदपत्रांचा आहे. लहान मुलांसाठी आणि मोठ्या व्यक्तींसाठी लागणारी कागदपत्रे वेगवेगळी असू शकतात. मुलाचे वय जर २१ दिवसांपेक्षा कमी असेल, तर फक्त हॉस्पिटलची डिस्चार्ज स्लिप पुरेशी आहे. पण २१ दिवसांनंतर अर्ज करायचा असल्यास SDM ऑर्डर, प्रतिज्ञापत्र (Affidavit) आणि ओळखपत्राची आवश्यकता लागते. या पोर्टलवरील कागदपत्रांची योग्य माहिती भरल्यास कोणत्याही वयातील व्यक्ती आपला जन्म दाखला सहजपणे मिळवू शकते.

जन्म दाखल्यासाठी अप्लाय कसं कराल?

  • सर्वात आधी crsorgi.gov.in या पोर्टलवर जा. त्यानंतर स्वतःची नोंदणी करा

  • नोंदणी झाल्यावर तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने पोर्टलवर लॉगिन करा.

  • 'Apply for Birth Certificate' वर क्लिक करून फॉर्म उघडा. त्यामध्ये जन्म तारीख, ठिकाण व पालकांची माहिती अचूक भरा.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (उदा. डिस्चार्ज स्लिप, आयडी प्रूफ किंवा एसडीएम ऑर्डर) स्कॅन करून अपलोड करा.

  • सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा.

  • अर्ज सादर केल्यावर मिळणारा 'रेफरन्स नंबर' जपून ठेवा. त्याद्वारे तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

२१ दिवसांपेक्षा कमी वयाचे बाळ असेल तर…

बाळ २१ दिवसांपेक्षा लहान असेल तर जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी फक्त रुग्णालयातून डिस्चार्ज स्लिप अथवा आई आणि बाळाचे कार्ड आवश्यक आहे. २१ दिवसांपेक्षा कमी वयाच्या बाळासाठी जन्म प्रमाणपत्र सहजपणे मिळवू शकता .

पुरुष किंवा स्त्रीच्या जन्म प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीसाठी जन्म प्रमाणपत्र बनवायचे असेल तर त्यासाठी तीन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. सर्वात महत्त्वाचे एसडीएम ऑर्डरची आवश्यकता आहे. तो नोटरी वकिलाकडून मिळवू शकता. १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनवला जातो. त्याशिवाय एक प्रतिज्ञापत्रही लागते. आधार, पॅन किंवा पासपोर्ट यासारख्या ओळखपत्राची आवश्यकता असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

High blood pressure: कसं ओळखाल की तुमचा रक्तदाब वाढलाय?

परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

Insomnia: निद्रानाशाने हैराण झालात? आत्ताच व्हा सावध, नाहीतर गमवाल जीव

SCROLL FOR NEXT