General Knowledge News Saam Tv
बिझनेस

General Knowledge News: मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनमध्ये किती असतात शून्य? सहज समजून घ्या '0' चं गणित...

GK News: मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनमध्ये किती असतात शून्य? सहज समजून घ्या '0' चं गणित...

साम टिव्ही ब्युरो

General Knowledge News: श्रीमंतांची संपत्ती असो किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्य असो.... त्यांची संख्या अब्ज किंवा ट्रिलियनमध्ये तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण तुम्हाला मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनचा अर्थ काय आहे हे माहित आहे का?

या आकड्यांमध्ये शून्यचा (0) खेळ काय आहे आणि कोणत्या आकड्याच्या मागे किती शून्य आहेत? एकक, दहा, शंभर, हजार, लाख, कोटी आणि 100 कोटी असे शब्द सामान्य लोकांमध्ये सर्रास ऐकायला मिळतात, यापलीकडे याचा वापर क्वचितच पाहायला मिळतो.

कोट्यधीश (Crorepati) किंवा अब्जाधीशांच्या संपत्ती आणि जीडीपी (Billionaires) डेटा व्यतिरिक्त, सोशल मीडियाच्या युगात व्हायरल होणार्‍या व्हिडीओ आणि चित्रांसाठी मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन हे शब्द वापरले जातात. म्हणजे, एक व्हिडीओ इतक्या मिलियन लोकांनी पाहिला... किंवा हे ट्वीट मिलियन लोकांनी लाईक केले. सोप्या भाषेत समजून घेऊ या की, हे आकडे नीट समजून घेण्याचे सोपे सूत्र कोणते आहे?  (Latest Marathi News)

Million चा अर्थ काय आहे?

सर्वात आधी मिलियनचा अर्थ काय आहे, याबद्दल जाणून घेऊ. व्हिडीओच्या व्ह्यूज किंवा लाइक्सच्या आधारे, जर या व्हिडीओला 1 मिलियन लाइक्स मिळाले असतील, तर याचा अर्थ 10 लाख लाईक्स मिळाले आहेत. जर आपण शून्याच्या दृष्टीने 1 मिलियन पाहिले तर 1 च्या मागे सहा शून्य लागतात.

1 मिलियन = 1000000

5 मिलियन = 5000000

Billion चा अर्थ काय आहे?

आता बिलियनचा अर्थ समजून घेऊ. 1 बिलियन म्हणजे एक अब्ज. जर आपण एखाद्याच्या संपत्तीनुसार पाहिले तर एखाद्या व्यक्तीची एकूण संपत्ती 5 बिलियन असेल, तर तो 5 अब्ज रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे, असे म्हटले जाईल. एक बिलियनला एक अब्ज रुपये किंवा 100 कोटी रुपये असेही म्हणतात. भारताची लोकसंख्या पाहिली तर ती सुमारे 1.4 बिलियन म्हणजेच 1.4 अब्ज किंवा 140 कोटी आहे. या आकड्यात 1 च्या मागे 9 शून्य लागतात.

1 बिलियन = 1,000,000,000

5 बिलियन = 5,000,000,000

Trillion चा अर्थ काय?

ट्रिलियन हा आकडा सहसा देशाची अर्थव्यवस्था सांगण्यासाठी वापरला जातो. भारताची चीनची अर्थव्यवस्था (जीडीपी) या ट्रिलियन डॉलर्सची होईल किंवा अमेरिकेची जीडीपी या ट्रिलियन डॉलर्सची होईल, अशा पद्धतीने हे वापरलं जातं. या आकड्यात 1 च्या मागे 12 शून्य लागतात.

1 ट्रिलियन = 10,00,00,00,00,000

5 ट्रिलियन = 50,00,00,00,00,000

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

SCROLL FOR NEXT