ITR Refund Saam Tv
बिझनेस

ITR Refund: ITR फाइल केल्यानंतर किती दिवसात येतो रिफंड? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

ITR Refund Status Process: आयटीआर फाइल केल्यानंतर रिफंड अकाउंटमध्ये जमा होतो. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने रिफंड स्टेट्स चेक करु शकतात.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल केल्यानंतर करदात्यांना रिफंड दिला जातो. यावर्षी आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला आयटीआर फाइल करता येणार आहे. परंतु तुम्ही आयटीआर भरण्यास जास्त उशिर करु नका, अन्यथा तुम्हाला रिफंड येण्यासदेखील उशिर होईल.

आयटीआर फाइल केल्यानंतर किती दिवसात रिफंड मिळतो? (How many days take for an ITR refund?)

तुम्ही आयटीआर फाइल केव्हा करता त्यावर तुम्हाला रिफंड कधी मिळणार हे समजते. आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, आयटीआर फाइल केल्यानंतर ४-५ आठवड्यात तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड जमा होतो. काही अडचणींमुळे तुमचा आयटीआर रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो. परंतु त्याबाबत तुम्हाला मेलवर माहिती दिली जाईल.

ITR रिफंड स्टेट कसा करायचा चेक? (How To Check Status Of ITR Refund)

सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा.

यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाका.

यानंतर e-File टॅबवर जा. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न्सवर क्लिक करा. त्यानंतर फाइल रिटर्न्सवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आयटीआर रिफंड स्टेट्‍स दिसणार आहे.

यानंतर तुम्हाला रिफंडबाबत सर्व माहिती मिळणार आहे. तुमचा रिफंड कधीपर्यंत येईल याबाबत अंदाज येईल.

रिफंड येण्यास उशिर होण्याची कारणे (Why ITR Refund Delayed Reason)

जर तुम्हाला आयकर रिफंड वेळेवर आला नाही तर त्यामागे काही कारणे असू शकतात.

जर तुमचं बँक अकाउंट प्री वॅलिडेट नसेल तर पैसे येणार नाही.

तुमचे बँक अकाउंट आणि पॅन कार्डवरील नाव सारखं नसेल तर रिफंड उशिरा येऊ शकतो.

IFSC कोड बरोबर नसेल तर अडचण येऊ शकते. (Reason Of Refund Failure)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT