Honor X9b Saam Tv
बिझनेस

Smartphone: फोन घ्यायचा विचार करताय? दमदार फीचरसह Honor X9b बाजारात लाँच; जाणून घ्या किंमत

Honor X9b : Honor कंपनीने नुकताच बाजारात Honor X9b स्मार्टफोन लाँच झाला आहे. स्मार्टफोनसोबत कंपनीने Honor Choice Watch आणि Honor Choice X5 earbuds देखील लाँच केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Honor X9b Smartphone Launch In India Know the Features And Price:

बाजारात नेहमी नवनवीन फोन लाँच होत असतात. बाजारात नुकताच Honor कंपनीने Honor X9b स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनसोबत कंपनीने Honor Choice Watch आणि Honor Choice X5 earbuds देखील लाँच केले आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध आहे.

किंमत

Honor X9b स्मार्टफोनच्या 8GB RAM+128Gb स्टोरेज व्हेरियंटची किंमत २५,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री १६ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन घेताना ICICI बँकेकडून पेमेंट केल्यावर स्मार्टफोनच्या खरेदीवर ३ हजार रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. तसेच फोनच्या पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला ५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील मिळतो. ग्राहकांना स्मार्टफोनवर ६ महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय या पर्यायाची सुविधादेखील मिळेल. या स्मार्टफोनवर अनेक ऑफर देण्यात आल्या आहे.

कंपनीने या स्मार्टफोनसोबत Honor Choice Earbuds आणि Honor Choice Watch लाँच केले आहे. याची किंमत ६,४९९ रुपये आहे. हे स्मार्टफोन तुम्हाला ऑफरमध्ये ५,९९९ रुपयांना मिळेल. हे स्मार्टवॉच २४ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Honor X9b या स्मार्टफोनमध्ये 5800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित असून MagicOS 7.2 या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Honor X9b स्मार्टफोनमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा, 5MP ultra wide Camera आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम देण्यात आहे. हा स्मार्टफोन 128GB इनबिल्ट स्टोरेजसह देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT