Honda SP160  saam Tv
बिझनेस

Honda SP160: दमदार फीचर्स असलेली होंडाची एसपी१६० बाईक लॉन्च, जाणून घ्या धमाकेदार मायलेज अन् किंमत

Honda SP160 : होंडा कंपनीने एसपी १६० बाईक लॉन्च केलीय. या बाइकमध्‍ये राइडिंग करताना स्‍मार्टफोन चार्ज करण्‍यासाठी यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील आहे.

Bharat Jadhav

होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज नवीन ओबीडी२बी प्रमाणित एसपी१६० च्‍या लाँन्चची घोषणा केली. आधुनिक राइडरसाठी डिझाइन करण्‍यात आलेली अपडेटेड एसपी१६० मध्‍ये आकर्षक नवीन डिझाइनसह सर्वोत्तम कार्यक्षमता आणि हाय-टेक फीचर्स आहेत. जी राइडिंग अनुभव अधिक उत्‍साहित करतात. नवीन २०२५ होंडा एसपी१६० ची किंमत १,२१,९५१ रूपयांपासून (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) सुरू होते.

अपडेटेड एसपी१६० लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक, अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी त्‍ सुत्‍सुमू ओटनी म्‍हणाले, “आम्‍हाला अपडेटेड नवीन एसपी१६०च्‍या लाँन्चची घोषणा करताना आनंद होतोय. लाँन्च झाल्‍यापासून वर्षभरात एसपी१६० ग्राहकांमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय ठरलीय. आता ओबीडी२बी-प्रमाणित इंजिन आणि प्रगत फीचर्स जसे टीएफटी डिस्‍प्‍लेसह होंडा रोडसिंक अॅपच्‍या माध्‍यमातून ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी यांच्‍या समावेशासह एसपी१६० ग्राहकांना राइडिंग याचा चांगला अनुभव देईल.''

या लाँन्चबाबत मत व्‍यक्‍त करत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाच्‍या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक योगेश माथूर म्‍हणाले, “एसपी१६० महत्त्वाकांक्षी तरूण राइडिंग करतात त्यांच्यासाठी दुचाकी बनवण्यात आलीय. आधुनिक डिझाइन, वैशिष्‍ट्य-संपन्‍न तंत्रज्ञान आणि अपवादात्‍मक मूल्‍यासह नवीन एसपी१६० स्‍टाइल व कार्यक्षमतेचा शोध घेत असलेल्‍या तरूण, तंत्रज्ञान-प्रेमी ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करेल. लाँन्च करण्‍यात आलेली अपडेटेड एसपी१६० १६० सीसी प्रीमियम कम्‍यूटर सेगमेंटमध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करेल.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन एसपी१६०: हाय-टेक फीचर्स

स्‍पोर्टीनेस व व्‍यावहारिकतेच्‍या मिश्रणासह बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेल्‍या अपडेटेड एस१६० मध्‍ये आकर्षक नवीन एलईडी हेडलॅम्‍प आहे. इतर वरचढ ठरणारे डिझाइन घटक आहेत शक्तिशाली फ्यूएल टँकसह स्‍पोर्टी श्रॉड्स, ऐरोडायनॅमिक अंडरकाऊल, बोल्‍ड मफलरसोबत क्रोम कव्‍हर आणि एलईडी टेललॅम्‍प. ही बाइक सिंगल डिस्‍क व डबल डिस्‍क या दोन व्‍हेरिएण्‍ट्ससह चार कलर पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असेल - रॅडियण्‍ट रेड मेटलिक, पर्ल इग्निअस ब्‍लॅक, पर्ल डीप अराऊंड ग्रे आणि अॅथलेटिक ब्‍ल्‍यू मेटालिक.

नवीन एसपी१६० मध्‍ये आता ४.२-इंच टीएफटी डिस्‍प्‍लेसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आणि होंडा रोडसिंक अॅप सुसंगता आहे, जे रिअल-टाइम टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल व एसएमएस अलर्ट्स, म्‍युझिक प्‍लेबॅक आणि प्रमुख माहिती विनासायासपणे देते. ज्‍यामुळे राइडरसाठी प्रत्‍येक राइड सोईस्‍कर होते. तसेच, या बाइकमध्‍ये राइडिंग करताना स्‍मार्टफोन चार्ज करण्‍यासाठी यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील आहे.

एसपी१६० मध्‍ये १६२.७१ सीसी, सिंगल सिलिंडर, फ्यूएल-इंजेक्‍टेड इंजिनची शक्‍ती आहे, जे आगामी सरकारी नियमनांची पूर्तता करण्‍यासाठी आता ओबीडी२बी प्रमाणित आहे. ही मोटर ७५०० आरपीएममध्‍ये ९.७ केडब्‍ल्यू शक्‍ती आणि ५२५० आरपीएममध्‍ये १०.९ एनएम सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते, तसेच ५-स्‍पीड गिअरबॉक्‍स आहे.

काय आहे किंमत

नवीन २०२५ होंडा एसपी १६० ची किंमत १,२१,९५१ रूपयांपासून, (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) सुरू होते. ही बाइक आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिपमध्‍ये उपलब्‍ध आहे.

मॉडेल व्‍हेरिएण्‍ट किंमत (एक्‍स-शोरूम दिल्‍ली)

एसपी१६० सिंगल डिस्‍क १,२१,९५१ रूपये

डबल डिस्‍क १,२७,९५६ रूपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT