Home Loan Property Paper Bank News  AI image
बिझनेस

Property Papers : घराची ओरिजनल कागदपत्र बँकेकडे? कायदेशीर मालकी हक्क कसा सिद्ध कराल?

Home Loan Documents News : गृहकर्ज घेतल्यानंतर घराची मूळ कागदपत्रे बँकेकडे असतात? विक्री करार, फेरफार नोंद, करपावत्या आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या मदतीने घराची मालकी कशी सिद्ध करावी, जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • गृहकर्ज घेतल्यावर बँक कर्जाच्या सुरक्षेसाठी घराची मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवते

  • मूळ कागदपत्रे बँकेकडे असणे म्हणजे घराची मालकी बँकेकडे जाणे नाही

  • नोंदणीकृत खरेदीखत किंवा विक्रीखत हा मालकी सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे

स्वतःचे घर घेण्यासाठी अनेक जण बँकेकडून गृहकर्ज घेतात. अशा वेळी घराशी संबंधित मूळ कागदपत्रे बँकेकडे जमा केली जातात. कर्जाची परतफेड पूर्ण होईपर्यंत ही कागदपत्रे बँकेच्या ताब्यात राहतात. मात्र, यामुळे घराच्या मालकीबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. मूळ कागदपत्रे बँकेकडे असताना आपणच घराचे कायदेशीर मालक आहोत, हे कसे सिद्ध करायचे? यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे.

बँक घराचे मूळ कागदपत्र का ठेवते?

गृहकर्ज घेताना संबंधित मालमत्ता कर्जाच्या सुरक्षेसाठी बँकेकडे गहाण ठेवली जाते. त्यामुळे बँक घराची मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवते. याचा अर्थ घराची मालकी बँकेकडे जाते, असा होत नाही. कर्जदाराने कर्जाची परतफेड पूर्ण केल्यानंतर बँकेकडून मूळ कागदपत्रे परत घेता येतात. त्यासोबत कर्जफेड पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि NOC देखील घ्यावे.

मालकी सिद्ध करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक?

  • विक्री करार : घर खरेदी करताना तयार झालेला विक्री करार हा मालमत्तेच्या व्यवहारातील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यात खरेदीदार आणि विक्रेत्याची माहिती तसेच मालमत्तेचा तपशील असतो.

  • जुन्या मालकीची कागदपत्रे: मालमत्ता यापूर्वी कोणाच्या नावावर होती आणि तिची मालकी कशी हस्तांतरित झाली, हे समजण्यासाठी जुन्या दस्तऐवजांची मदत होते.

  • फेरफार नोंद: महसूल किंवा संबंधित स्थानिक प्रशासनाच्या नोंदींमध्ये मालमत्तेबाबत कोणाचे नाव आहे, याची माहिती फेरफार नोंदीतून मिळू शकते. मात्र, ही नोंद एकटीच मालकीचा अंतिम पुरावा ठरत नाही.

  • मालमत्ता कराच्या पावत्या: घराचा कर नियमित भरल्याच्या पावत्या मालमत्तेशी संबंधित नोंदींसाठी उपयुक्त ठरतात.

  • वीज आणि पाणीबिल: घराच्या वापराशी संबंधित हे दस्तऐवज पूरक पुरावा म्हणून वीज आणि पाणीबिल उपयोगी पडू शकतात.

  • बँकेची कागदपत्रे: गृहकर्ज करार, कर्ज मंजुरीपत्र आणि मूळ कागदपत्रे जमा केल्याची पावती जपून ठेवावी.

मूळ खरेदीची प्रत कुठे मिळेल?

मूळ कागदपत्रे बँकेकडे असल्यास संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयातून विक्री करारची प्रत मिळवता येऊ शकते. त्यासाठी संबंधित राज्यातील नियम आणि उपलब्ध प्रक्रियेची माहिती घ्यावी.

घरमालकांनी काय काळजी घ्यावी?

मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रांचे फोटो आणि डिजिटल प्रत सुरक्षित ठेवा. गृहकर्ज पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून सर्व मूळ दस्तऐवज परत मिळाल्याची खात्री करा. मालकीबाबत वाद किंवा शंका निर्माण झाल्यास अनुभवी मालमत्ता वकिलांचा सल्ला घ्या. केवळ करपावत्या किंवा वीजबिलावर मालकी सिद्ध होत नाही. नोंदणीकृत खरेदीखत, जुन्या मालकीच्या नोंदी आणि संबंधित सरकारी दस्तऐवज एकत्रितपणे महत्त्वाचे ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

Cotton Saree Designs For Women: दिवाळीसाठी कॉटनच्या साड्या डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

SCROLL FOR NEXT