Hero Splendor Plus Special Edition Saam Tv
बिझनेस

Hero Splendor Plus ची स्पेशल एडिशन लॉन्च, देते 73kmpl चा मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero MotoCorp New BIke: Hero MotoCorp ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Hero Splendor Plus ची स्पेशल एडिशन भारतात लॉन्च केला आहे.

Satish Kengar

Hero MotoCorp ची सर्वाधिक विक्री होणारी बाईक Splendor Plus चे 30 वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने कंपनीने आपला स्पेशल एडिशन बाईक (30th anniversary edition) लॉन्च केली आहे. नवीन मॉडेलमध्ये नवीन ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. आता ही बाईक आधीपेक्षा जास्त मायलेज देई, असं कंपनीचं म्हणणं आहे. नवीन स्प्लेंडर प्लसमध्ये तुम्हाला काही नवीन फीचर्स पाहायला मिळतील, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Splendor+ XTEC 2.0 चे इंजिन

नवीन जनरेशन स्प्लेंडर प्लसमध्ये 100cc i3s इंजिन आहे. जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहे.

कंपनीचा दावा आहे की, हे इंजिन अधिक चांगले मायलेज देईल आणि याला 6000 किलोमीटरपर्यंत सर्व्हिसची गरज नाही. ही एका लिटरमध्ये 73 किमी मायलेज देईल. या बाईकवर कंपनी 5 वर्षे किंवा 70,000 किलोमीटरची वॉरंटी देत आहे.

फीचर्स

या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर मिनार. यामध्ये तुम्हाला रियल टाइम मायलेजची माहितीही मिळेल. याशिवाय यात ब्लूटूथ, कॉल, एसएमएस आणि बॅटरी अलर्टची सुविधा आहे. तसेच यात यूएसबी पोर्ट असेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता.

बाईकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बाईकची साधी डिझाइन ही तिची ओळख आहे. पण त्यात नवीन ग्राफिक्स आणि लाल रेषा पाहायला मिळतील. याच्या पुढील आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा असेल, याशिवाय यात एलईडी टेललाइट आणि हेडलाइट आहे. या बाईकच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : नाशिककरांनो पाण्याचा जपून वापर करा, शहरातील 'या' भागात आज पाणी नाही | VIDEO

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Maharashtra Live News Update: मुंडवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीलत तेजवानी विदेशात पळून जाण्याची शक्यता

Konkan Tourism : खळखळणाऱ्या लाटा अन् थंड वाऱ्याची झुळूक, कोकणातील 'हा' समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावतो

Veen Doghatli Hi Tutena: समर-स्वानंदीचा थाटच न्यारा! गोव्यात लग्न अन् मुंबईत केळवण; पाहा शाही विवाह सोहळ्याचा VIDEO

SCROLL FOR NEXT