हीरोकडून नवी Destini 110 स्कूटर लाँच केली आहे.
स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन, 8.1 BHP पॉवर आणि 56.2 kmpl मायलेज
स्कूटरचे दोन व्हेरिएन्ट्स – VX आणि ZX मध्ये उपलब्ध
एलईडी लाइट्स, USB चार्जिंग पोर्ट आणि ट्यूबलेस टायर्ससह फीचर्स
Hero Destini Scooter Launch: जीएसटीत सुधारणा झाल्याने ऑटो बाजार क्षेत्रातही मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऑटो बाजार क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांचे दर कमी केले आहेत. हीरोनेही ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. हीरोने बाजारात नवी स्कूटर लाँच केली आहे. हीरोने नवीन स्कूटर Destini 110 लाँच केली आहे. ही नवी स्कूटरची किंमत ७२००० रुपयांनी सुरुवात होत आहे. या स्कूटरचा लूक आणि डिझाइन देखील हटके आहे.
जानेवारी २०२५ कंपनीने Destini 125 चा नवा अवतार सादर केला होता. त्यानंतर आता कंपनीने स्कूटर Destini 110 लाँच केली आहे. कंपनीने दोन व्हेरिएन्ट्स बाजारात आणले आहेत. व्हीएक्स व्हेरिएन्टची किंमत ७२०० रुपये आहे. तर झेडएक्सची किंमत ही ७९००० रुपये (एक्स-शोरुम) आहे.
स्कूटरचा मॉडल हा Destini 125 या सारखा आहे. यामध्ये एच-शेफ्ड एलईडी डे टाइम-रनिंग लाइट आणि एलईड टेललॅप देण्यात आलं आहेत. स्कूटरलाही आरामदायी सीट्स दिल्या आहेत.
व्हीएक्स व्हेरिएन्ट - राखाडी, निळा आणि पांढरा
झेडएक्स व्हेरिएन्ट - राखाडी, निळा आणि पांढरा
इंजिन आणि परफॉर्मन्स
Destini 110 या स्कूटरला कंपनीने ११०.९ सीसी इंजिन दिलं आहे. ८.१ बीएचपी पॉवर दिली आहे. तसेच ८.८७ एनएम टॉर्क जनरेट होतं. स्कूटर ५६.२ केएमपीएलचं मायलेज देते. झेडएक्स व्हेरिएन्ट कंपनीत कॅस्ट व्हील्स आणि फ्रंट डिस्क ब्रेक देखील दिले आहेत. व्हीएक्स व्हेरिएन्टमध्येही ड्रम ब्रेक सेटअप दिला आहे.
दोन्ही व्हेरिएन्टमध्ये प्रोजेक्टर एलईडी हेडलाइट, एलइडी टेललँप, डिगी-एनालॉग स्पीडोमीटर,फ्रंट ग्लव बॉक्स, इनबिल्ट यूएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे सिंगल साइड शॉक देण्यात आला आहे. दोन्ही व्हेरिएन्टमध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.