HDFC Bank 
बिझनेस

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! व्याजदरात केले बदल, वाचा EMI वर काय होणार परिणाम

HDFC Interest Rate Changed: एचडीएफसी बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. त्यामुळे ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

HDFC बँकेचा मोठा निर्णय

व्याजदरात केले बदल

MCLR मध्ये ५ बेसिस पॉइंट्सने कपात

देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक एचडीएफसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने बिझनेस आणि होम लोनवरील व्याजदरात बदल केला आहे. यामुळे भविष्यात बिझनेस, होम लोन स्वस्त होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये कपात केली आहे.

एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये ५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. कालपासून हे नवीन दर लागू झाले आहे. यामुळे आता MCLR दर ८.१० ते ८.५५ टक्क्यांपर्यंत झाले आहेत. हे दर आधी ८.१५ ते ८.५५ टक्के होते.

काय आहे MCLR ?

MCLR हे किमान व्याजदर असते. या दरापेक्षा कमी व्याजदरात लोन देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१६ मध्ये याची सुरुवात केली आहे. हे दर निश्चित करण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घेतल्या आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत.

नवीन दर वाचा

१ दिवस- ८.१० टक्के

१ महिना- ८.१० टक्के

तीन महिने- ८.२० टक्के

सहा महिने- ८.३५ टक्के

१ वर्ष -८.३५ टक्के

२ वर्ष- ८.४५ टक्के

३ वर्ष -८.५ टक्के

या ग्राहकांना मिळणार फायदा

MCLR मधील कपातीचा सर्वाधिक फायदा ज्यांचे कमी कालावधीसाठी लोन आहे त्यांना होणार आहे. बिझनेस लोन किंवा वर्किंग कॅपिटल घेणाऱ्या कंपन्या, शॉर्ट टर्म लोन घेणार ग्राहक यांना फायदा होणार आहे. या ग्राहकांचा ईएमआय थोडा कमी होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

Monsoon Fever : डेंग्यू, मलेरिया नाही; पावसाळ्यात वारंवार ताप येणे असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण

Maharashtra News Live Update: आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे - राहुल गांधी

Pune : पुण्यातील पेठाही आता FDA च्या रडारावर, अनेक मिठाईच्या दुकानावर छापा; ५ हॉटेलचे परवाने रद्द

Political News :"राहुल गांधी हे २४ तास ड्रग्सच्या नशेत असतात" भाजप आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT