GST Council Meeting Saam Digital
बिझनेस

GST Council Meeting: जीएसटी परिषदेची २२ जून रोजी महत्त्वाची बैठक ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार का?

Sandeep Gawade

केंद्रात एनडीएचं सरकार आलं असून नवीन सरकारची 22 जून रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत जीएसटी परिषदेची ५३ वी बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर परिषदेची ही पहिलीच बैठक असेल. मात्र बैठकीचा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. 7 ऑक्टोबर 2023 रोजी GST परिषदेची 52 वी बैठक झाली. या बैठकीत सर्व घटक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सहभागी झाले होते.

जीएसटीतून सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल आणि मे महिन्यात जीएसटी संकलनात मोठा उच्चांक पहायला मिळाला होता. जीएसटी संकलना प्रथमच 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं होतं. अर्थसंकल्पही पुढील महिन्यात सादर करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने २२ जूनची जीएसटी परिषद महत्त्वाची ठरू शकते.

पेट्रोल आणि डिझेलसह काही मुद्दे जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेकवेळा मांडले गेले आहेत. यापूर्वी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूसारख्या वस्तूंना वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्याचा प्रयत्न करेल. मात्र याबाबत राज्य आणि केंद्रात अद्याप एकमत झालेले नसल्याचं म्हटलं होतं.

एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले होते. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.. मासिक आधारावर विचार केला तर आतापर्यंतची ही दुसरी सर्वात मोठी आकडेवारी होती. 23-24 या आर्थिक वर्षात 20.14 लाख कोटी रुपये GST संकलन झालं आहे, जे 22-23 च्या तुलनेत 11.7 टक्के अधिक होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

SCROLL FOR NEXT