Gratuity Rules Saam Tv
बिझनेस

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

Gratuity New Rules: नोकरी सोडल्यानंतर किंवा सेवानिवृत्तनंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली जाते. ग्रॅच्युटीचे नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत. ग्रॅच्युटीवर टॅक्स लातो का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Siddhi Hande

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

ग्रॅच्युटीवर टॅक्स लाागतो का?

नोकरी सोडण्यापूर्वी हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ग्रॅच्युटीच्या नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. ग्रॅच्युटी ही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांनी खूप वर्ष काम केल्यानंतर त्यांना हे पैसे मिळतात. भारतात ग्रॅच्युटी पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अॅक्ट १९७२ द्वारे नियंत्रित आहे. ही रक्कम सेवानिवृत्ती किंवा नोकरी सोडल्यानंतर एकरकमी दिली जाते. दरम्यान, ग्रॅच्युटीवर टॅक्स लागतो का, ग्रॅच्युटी कशी मोजली जाते हे जाणून घ्या.

ग्रॅच्युटीसाठी पात्रता काय? (Gratuity Eligibility)

ग्रॅच्युटीसाठी कर्मचाऱ्याने एका कंपनीत किमान सलग वर्ष तरी काम केलेले असावी. त्यानंतरच कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी मिळते. दरम्यान, नवीन कामगार कायद्यानुसार, आता फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना एका वर्षांपर्यंत काम केल्यानंतर ग्रॅच्युटी मिळते. यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

ग्रॅच्युटीची गणना तुमचा शेवटच्या महिन्यातील पगाराच्या आधारावर केली जाते. शेवटचा × 15 × कामाचा कालावधी) ÷ 26 अशी ही गणना केली जाते. दर तुमचा शेवटचा पगार ५०,००० रुपये असेल आणि तुम्ही १० वर्ष काम केले असेल तर तुम्हाला २.८८ लाख रुपये ग्रॅच्युटी मिळू शकते.

ग्रॅच्युटीवर कर लागतो का?

ग्रॅच्युटीवर काही परिस्थितीमध्ये कर लागतो तर काही परिस्थितीमध्ये कर लागत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युटी पूर्णपणे करमुक्त असते. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २० लाखांपर्यंतची ग्रॅच्युटी करमुक्त आहे.जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त ग्रॅच्युटी एकरकमी मिळाली तर त्यावर कर लागतो. जर तुम्हाला २५ लाखांची ग्रॅच्युटी मिळाली तर त्यातील २० लाख रक्कम करमुक्त असेल आणि उर्वरित ५ लाखांवर कर लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT