Subhadra Yojana For Women Saam Tv
बिझनेस

Subhadra Yojana: खुशखबर! महिलांना दरवर्षी मिळणार 10 हजार रुपये, सरकारचं मोठं गिफ्ट; कसा घेता येईल लाभ? वाचा

Subhadra Yojana For Women: महिलांसाठी सरकारने नवीन योजना राबवली आहे. दरवर्षी महिलांना १० हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घेऊया.

Siddhi Hande

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात अनेक योजना या महिलांसाठी आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून या योजना राबवण्यात आल्या आहेत. महिलांसाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या योजना आहेत.त्यातीलच एक योजना म्हणजे सुभ्रदा योजना. सुभ्रदा योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला १० हजार रुपये दिले जातात.

ओडिशा सरकारने महिलांसाठी ही योजना राबवली आहे.या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाला चालना दिली आहे. महिलांना वर्षाला १० हजार देण्यात येतात. ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेसाठी कोण अर्ज करु शकतात ते जाणून घेऊया.

महिलांना मिळणार १० हजार रुपये

ओडिशा सरकारने महिलांसाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना वार्षिक १० हजार रुपये दिले जातात. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. म्हणजेच महिलांना ५०००० रुपयांची मदत केली जाते. सरकार ही रक्कम महिलांच्या खात्यात दोनदा जमा करते.

लाभ कोणाला घेता येईल?

या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ओडिशा राज्यातील मूळ रहिवासी महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांनी याआधी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज कसा करावा?

सुभ्रदा योजनेसाठी महिला अंगणवाडी केंद्र, ब्लॉक ऑफिस किंवा जनसेवा केंद्रातून अर्ज करु शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी फॉर्म भरुन कागदपत्रे सबमिट करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

Prajakta Mali : 'फुलवंती'ची OTT वर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; चक्क हॉलिवूडला टाकलं मागे, प्राजक्ता माळीने चाहत्यांचे मानले आभार

Maharashtra Exit Poll: संगरनेरमध्ये बाळासाहेब थोरात होणार आमदार? VIDEO

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT