Government Schemes For Girls Saam Tv
बिझनेस

Government Scheme For Girls: मुलींसाठी या सरकारी योजना ठरतील फायदेशीर; शिक्षणापासून लग्नापर्यंत मिळणार लाभ

Government Scheme: सरकार मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी नेहमीच नवनवीन योजना राबत असतात. या योजनांअंतर्गत मुलींना शिक्षणापासून लग्नापर्यंत लाभ मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Government Scheme For Girls Sukanaya Samridhi Yojana:

नागरिकांच्या हितासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत असतात. नागरिकांना आर्थिक मदत मिळावी या उद्देषाने या योजना राबवल्या जातात. देशात मुलींसाठी काही खास योजना राबवण्यात येतात. जेणेकरुन मुलींच्या उज्वल भविष्यासाठी तिला मदत होईल. सरकारने मुलींसाठी राबवलेल्या काही योजनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Latest News)

सुकन्या समृद्धी योजना

मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना खूप उपयुक्त आहे. मूली दहा वर्षांच्या होईपर्यंत या योजनेत खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजना खाते हे फक्त २५० रुपयांनी उघडू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही एका आर्थिक वर्षात १.५ लाख रुपये जमा करु शकता. मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत हे खाते सुरू राहिल. मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही या योजनेतून ५० टक्के रक्कम काढू शकतात. सरकार या योजनेवर ७.६ टक्के वार्षिक व्याजदर देते.

बालिका समृद्धी योजना

केंद्र सरकारने बालिका समृद्धी योजना सुरु केली होती. त्यानंतर आता ही योजना राज्य सरकार राबवत आहे. दारिद्रयरेषेखालीली कुटुंबासाठी बालिका समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुलीच्या जन्मानंतर तिला ५०० रुपये दिले जातात. याचसोबत मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर स्कॉलरशिपदेखील दिली जाते. (Government Scheme)

उडान सीबीएसई स्कॉलरशिप प्रोग्राम

उडान (UDAAN) प्रकल्पाअंतर्गत मुलींना अंभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला जातो. अंभियांत्रिकी क्षेत्रात मुलींची नोंदणी वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत मुली ११ मध्ये शिकणारी प्रत्येक विद्यार्थिनी मोफात ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोचिंग घेऊ शकते. या योजनेअंतर्गत ६ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींचा ३ टक्के कोटाअंतर्गत अंभियांत्रिकी शिक्षणामध्ये जागा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Maval Heavy Rain : मुसळधार पावसाचा तडाखा; मावळ झाले जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन नव्या मेट्रो स्थानकाला सरकारने दिली मंजुरी, वाचा सविस्तर

Reducing sweets: जगभरात 250 कोटी लोकं 'या' गंभीर आजाराशी झुंजतायत; आहारातील गोड कमी करणं ठरेल उपाय, WHO चा इशारा

Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

SCROLL FOR NEXT