Government Guidelines Google
बिझनेस

Government Guideline For Social Media: इन्स्टाग्राम-फेसबूक वापरण्याआधी सरकारच्या गाइडलाइन समजून घ्या; अन्यथा पश्चातापाची वेळ येईल

Government Guidelines: सोशल मीडिया सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेकजण गैरफायदा घेतात. हॅकर्स डेटाचा चुकीच्या कामांसाठी वापर करतात. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Government Guidelines For Instagram And Facebook Account:

सध्या सोशल मीडिया ही काळाची गरज बनले आहे. सोशल मीडियाद्वारे आपल्याला सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. मात्र, या सोशल मीडियाचा अनेकजण गैरफायदा घेतात. अनेकदा युजरच्या प्रोफाइलचा वापर करुन सायबर क्राइमचे गुन्हे होतात. त्यामुळेच सरकारने सोशल मीडियाबाबत गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. (Latest News)

सरकारने फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सोशल मीडिया अकाउंटबाबत गाइडलाइन्स जारी केले आहेत. सोशल मीडियाच्या अकाउंटचा गैरवापर होऊ नये. यासाठीच CERT-In ने गाइडलाइन दिल्या आहेत. यामध्ये तुम्ही सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित कसे ठेवू शकता हे सांगितले आहे. CERT-In ही एक सरकारी संस्था आहे. ही संस्था अॅप्स किंवा सर्व्हिसमधील बग्जचे निरिक्षण करते. त्यानंतरच संस्थेने सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित कसे ठेवायचे याबाबत गाइडलाइन्स दिल्या आहे.

एका वृत्तानुसार, CERT-In ने म्हटले आहे की, सध्या हाय प्रोफाईल सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंच, सरकारी खाती यांच्यावर सायबर हल्ले वाढले आहेत. यामुळे सोशल मीडिया अकाउंटचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पासवर्ड चांगला ठेवणे महत्त्वाचे आहे. पासवर्ड कोणालाही समजणार नाी असा ठेवावा. मल्टी फॅक्टर प्रमाणीकरणे खाते अधिक सुरक्षित असते. यामुळे पासवर्ड माहित असूनही हॅकर्संना तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश मिळत नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी वेगळा ई-मेल असणे गरजेचे आहे. तसेत तुमच्या फोनचा जीपीएस अॅक्सेस सोशल मीडियासाठी बंद करा. जेणेकरुन हॅकर्संना तुमचे लोकेशन ट्रॅक करता येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT