EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

EPFO Wage Limit May Increase: ईपीएफओ लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ईपीएफओमध्ये पगाराची मर्यादा वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

कर्मचारी निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी पेन्शन योजनेत सदस्यांनी केलेल्या गुंतवणूकीवर मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, केंद्र कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत संकेत दिले आहे. कर्मचारी पेन्शन योजना आणि ईपीएफओमध्ये योगदान करण्याची रक्कम आता वाढवण्यात येणार आहे. जर ईपीएफओ आणि पेन्शन योजनेत पैसे वाढवले तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक कोटी रुपये मिळू शकतील.

ईपीएफ (EPF)

जर सध्या कर्मचाऱ्याचा पगार हा दर महिन्याला १५,००० किंवा त्यापेक्षा कमी असेल तर कर्मचारी आणि नियोक्चा दोघेही पगाराच्या १२ टक्के योगदान देतात. यामध्ये ८.३३ टक्के पेन्शन योजनेत तर उरलेले ३.६७ टक्के भविष्य निर्वाह योजनेत जमा केले जातात. म्हणजे जर तुमचा पगार दर महिन्याला १५,००० रुपये असेल तर भविष्य निर्वाह निधीमध्ये १,८०० रुपये जमा होतील. तर नियोक्त्याकडून भविष्य निर्वाह निधीमध्ये ५५०.५० रुपये तर पेन्शन योजनेत १,२४९ रुपये जमा केले जातात.

नवीन ईपीएफओ मर्यादा काय असेल? (EPFO Wage Limit)

ही वेतन मर्यादा २१,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर २१,००० पगाराच्या तुलनेत तुमचे पैसे ईपीएफओ आणि पेन्शन योजनेत जमा केले जातील. २१,००० रुपये पगार असेल तर कर्मचाऱ्याचे योगदान २,५२० रुपये असेल आणि नियोक्ताचे योगदान ईपीएफमध्ये ७७० आणि पेन्शन योजनेत १,७४९ रुपये असेल.

नोकरदारांना फायदा

जर ईपीएफओची मर्यादा २१,००० रुपयांपर्यंत वाढवली तर ३५ वर्ष जर तुम्ही ३५ वर्ष योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा निधी १ कोटीपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच २३व्या वर्षी जर तुम्ही ईपीएफओ आणि ईपीएसमध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला १ कोटी रुपये मिळू शकतात.

ईपीएओमधून पैसे काढण्याची मर्यादा (EPFO Wage Limit May Increase)

ईपीएफओने आता पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता तुम्ही वैद्यकीय आप्तकालीन परिस्थितीत १ लाख रुपये काढू शकतात. पूर्वी तुम्ही फक्त ५०,००० रुपये काढू शकत होता. परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT