8th Pay Commission meta ai
बिझनेस

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना जॅकपॉट लागण्याची शक्यता! ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी; Level-10 मुळे पगार किती वाढणार?

8th Pay Commission Salary Hike : आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करत आहे. ३.२५ फिटमेंट फॅक्टर, लेव्हल १० वेतन आणि आणि भत्त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग सध्या विविध कर्मचारी संघटना, यूनियन आणि संस्थांच्या प्रतिनिधींच्या मागण्या जाणून घेत आहे. चंदीगडमधील आयोगाची दोन दिवसांची बैठक १८ सप्टेंबरला संपली असून, आता ७ आणि ८ ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये संबंधित पक्षांची चर्चा होणार आहे. या बैठकींमध्ये कर्मचाऱ्यांची सॅलरी, भत्ता आणि सेवा - सुविधांबाबतच्या मागण्यांवर चर्चा होत आहे.

चंदीगड बैठकीनंतर Nurses Welfare Associations (NWA) आणि PGIMERच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली. या संघटनांचा दावा आहे की मागण्या मान्य झाल्यावर केंद्र सरकारची रुग्णालये, AIIMS, ESIC आणि इतर आरोग्य संस्थांमधील ३ लाखांहून जास्त नर्सिंग कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.

नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी Level-10 एंट्री- लेव्हल पे लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. GNM ऐवजी BSc Nursingच्या वाढीव पात्रतेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली असून, नर्सिंग अधिकाऱ्यांना मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या समकक्ष स्थान देण्याच्या मागणीचाही उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच सर्व नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी डेडिकेटेड नाईट ड्युटी अलाउन्स, R1H1 मॅट्रिक्स अंतर्गत रिस्क अँड हार्डशिप अलाउन्स, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सची मागणी करण्यात आली आहे. HRA आणि TAच्या गणनेसाठी चंदीगडचा A1 सिटीमध्ये समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच नर्सिंग, ड्रेस आणि स्पेशल अलाउन्समध्ये वाढ, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे तसेच वार्षिक इन्क्रिमेंट ३ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याची मागणी आहे.

PGIMER मधील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. वाढती महागाई, घरभाडे, शिक्षण आणि आरोग्य खर्च लक्षात घेता जास्त फिटमेंट फॅक्टर असणं गरजेचं असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे.

मात्र, आठव्या वेतन आयोगाकडून अंतिम शिफारसी किंवा नवीन फिटमेंट फॅक्टर अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पगारात किती वाढ होईल, हे आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि त्यानंतरच्या सरकारी निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर निषेध आंदोलनाचे आयोजन

राजकीय भूकंप! 3 माजी मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Black Pepper Benefits For Irregular Periods : दर महिन्याला मासिक पाळी येत नसेल तर काळ्या मिरीचा सोपा उपाय करून पाहा, आराम मिळेल

Entertainment News : ब्रेकअपनंतर युट्युबर अडकणार लग्नाच्या बेडीत! मदीनेत पार पडणार निकाह; होणाऱ्या बायकोचा फोटो आला समोर

Katrina Kaif: कतरिना कैफच्या नव्या लूकवर चाहते फिदा! बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अभिनेत्रीने दाखवला आरसा

SCROLL FOR NEXT