Government Employees Saam Tv
बिझनेस

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! १० वर्षांनी नियमांत केला मोठा बदल

New Rule For Government Employees CGHS reforms: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने सरकारी स्वास्थ्य योजनेच्या दरात बदल केले आहेत. या नवीन दरामुळे कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सरकारी स्वास्थ्य योजनेच्या (CGHS)दरात बदल

कॅशलेस व्यव्हारासाठी होणार फायदा

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तब्बल १० वर्षांनी सरकारी स्वास्थ्य योजनेच्या (CGHS)दरात बदल केले आहेत. हे नवीन दर १३ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे ४ लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा मिळणार आहे. (CGHS reforms)

सरकारी स्वास्थ्य योजनेच्या (CGHS) दरात बदल

सरकारी स्वास्थ्य योजनेच्या (CGHS) दरात वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर सर्व रुग्णालये, शहर आणि वार्डाच्या आधारावर निश्चित केले आहेत. सरकारने हे नवीन दर सर्व रुग्णालयांना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या नवीन नियमांमुळे कॅशलेस सुविधेत सकारात्मक बदल होईल. याचसोबत रुग्णालयांनादेखील फायदा होणार आहे.ही दर २५ ते ३० टक्के वाढवण्यात आली आहेत.

कॅशलेस उपचारासाठी महत्त्वाचा निर्णय

CGHS अंतर्गत असणारी रुग्णालये कॅशलेस उपचार देण्यासाठी नकार करत होते, याबाबत अनेक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी तक्रार केली होती. यामध्ये रुग्णांना अॅडमिट करण्याआधीच पैसे द्यावे लागायचे त्यानंतर काही महिन्यांनी रिफंड मिळायचा. यामुळे कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधेचा वापर करता येत नव्हता.

दरम्यान, यावर खाजगी रुग्णालयांनी सांगितले होते की, जुने दर हे खूप कमी होते. ही दरे सध्याच्या मेडिकल खर्चांनुसार नव्हती. त्यामुळेच या दरात वाढ करण्याची मागणी केली होती.

CGHS च्या दरात २०१४ मध्ये शेवटचा बदल केला होता. तेव्हाही हा बदल फार मोठा नव्हता. त्यामुळे कर्मचारी आणि रुग्णालये दोघांनाही फटका बसत होता. याचमुळे केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १३ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. सर्व रुग्णालयांना हे दर स्वीकारणे अनिवार्य आहे. जर त्यांनी या दराचा स्वीकार केला नाही तर त्यांना CGHS यादीतून काढून टाकले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharshtra Politics: मनसे की ठाकरेसेना, मुंबईत महापौर कोणाचा? ठाकरेंचा पाच महापालिकांचा फॉर्म्युला ठरला?

Accident : इटलीमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि कारची जोरदार धडक, ४ भारतीयांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT