Government Decision Saam Tv
बिझनेस

Government Decision: खुशखबर! सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच होणार वाढ; सरकारने दिले निर्देश

Government Decision For Bank Employees Salary Hike: सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ केली जाणार आहे. याबाबत सरकारने निर्देश दिले आहेत.

Siddhi Hande

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार

१ वर्षाच्या आत वेतनवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

१ नोव्हेंबर २०२७ पासून लागू होणार नवीन पगारवाढ

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. यानंतर आता सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांच्याही पगारवाढीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारच्या म्हणण्यांनुसार, पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या प्रक्रियेत वेळ लावू नये. यासाठी लवकरच काम सुरु करावे.

बँकांनी सांगितले आहे की, १३ व्या द्विपक्षीय करारावर शक्य तितक्या लवकरच निर्णय घ्यावा. एका वर्षाच्या आता हा निर्णय घेण्यास सांगितले आहे. सरकारी बँक कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२७ पासून लागू होणारी वेतनवाढ वेळेवर व्हावी. कर्मचाऱ्यांना जास्त वाट पाहावी लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

१३व्या वेतन कराराची तयारी

सर्वाजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्था दर पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करतात. यामध्ये विमा कंपन्यांचाही समावेश असतो. विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचाही पगार दर पाच वर्षांनी वाढतो.पीटीआयत्या वृत्तानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी वेतन सुधारणा १ नोव्हेंबर २०२७ पासून लागू होणार आहे.

या प्रक्रिया इंडियन बँक असोसिएशन कर्मचारी संघटना आणि संस्थांशी बोलले जाते. त्यानंतर परस्पर संमतीने वेतन करार मंजूर केला जातो.

वेतनवाढीची प्रक्रिया वेळेवर होणे गरजेचे

कामकाजातील स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी वेतन करार वेळेवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे आतापासून वेतन करारावर काम करण्यास सुरुवात करण्याचे वित्तीय सेवा विभागाने सांगितले आहे. २० एप्रिलला याबाबत पत्रक जारी केले. यामध्ये बँकांनी ही प्रक्रिया जास्तीत जास्त १२ महिन्यात पूर्ण करावे, असं नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

Dapoli : कड्यावर वसलेलं गणपतीचं सुंदर मंदिर, दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

SCROLL FOR NEXT