Digital Satbara: डिजिटल 7/12 ला अधिकृत मान्यता, सरकारी, बँक आणि न्यायालयीन कामांसाठी ठरेल वैध

Digital Satbara : सातबाऱ्यांसाठी सही आणि शिक्क्याची झंझट आता संपलीय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी डिजीटल सातबाऱ्यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्वसामान्यांचे तलाठी कार्यलयातील हेलपाटे कसे कमी होणार? डिजीटल सातबऱ्यासाठी किती पैसे लागणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Digital Satbara
Digital 7/12 Gets Legal Status For All Government And Banking Worksaam tv
Published On
Summary
  • जमीन व्यवहार, सरकारी आणि बँकिंग कामांसाठी डिजिटल 7/12 आता वैध असेन.

  • महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत मोठा निर्णय जाहीर केला.

  • डिजिटल सातबाऱ्यासाठी मोठा निर्ण

आता तलाठी कार्यालयात हेलपाटं मारण्याची झंझट संपणार आहे. कारण आता डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर संरक्षण देण्यात आल्यानं तलाठ्याच्या सही आणि स्टॅम्पची गरज आता संपणार आहे. असा निर्णयच महसूल विभागानं घेतलाय. त्यामुळं रखडलेले जमीनीचे व्यवहार एका झटक्यात मार्गी लागणार आहेत. त्याची माहितीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय. मात्र हा निर्णय काय आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

खरंतर आधीच डिजिटल 7/12 मिळत होता. मात्र त्याला कायदेशीर संरक्षण नव्हतं.. त्यामुळे डिजिटल 7/12 काढल्यानंतरही तलाठ्याच्या सही आणि शिक्क्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह 7/12, 8 अ उतारा काढण्यासाठी तलाठ्याच्या दारात हेलपाटे माराव्या लागणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार, हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com