Google मॅप हे एक लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे हे तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत सहज पोहोचण्यात मदत करते. गुगल मॅप फक्त रस्ता दाखवण्याचं काम करत नाही तर इतर काही सेवा या अॅपमधून आपल्याला मिळत असतात. गुगलमध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्याचा उपयोग करून तुम्ही दंडापासून वाचू शकतात. टोल दर आणि मार्गासह गुगल मॅप्सवर टोलमुक्त मार्ग देखील मॅपमध्ये दाखवले जातात. (Latest News)
टोलची माहिती मिळते
या फीचरच्या मदतीने गुगल मॅप्स युजर्सला त्यांच्या प्रवासाची प्लॅनिंग अधिक चांगल्यारित्या करता येते. गूगल मॅप्समध्ये देण्यात आलेल्या या नवीन फीचर मध्ये रस्त्यात लागणाऱ्या टोल-किंमतीची माहिती दिली जाते. स्थानिक टोल प्राधिकरणाकडून टोलशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी टोलचा खर्च किती येऊ शकतो याचा हिशोब आधीच करता येणार आहे. इतकेच नाही तर गुगल मॅपवर ट्राफिक लाईट, स्टॉप साईन, बिल्डिंग आउट लाईन, रस्त्यांची रुंदी अशा अनेक गोष्टीचीही माहिती मिळते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवीन फीचर काय आहेत
स्पीड लिमिट वॉर्निंग :
हे फीचर तुमचा वेग ट्रॅक करते आणि जर तुम्ही वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असाल तर तुम्हाला वॉर्निंग देते. हे फीचर तुम्हाला चलन कपात टाळण्यास मदत करू शकते.
स्पीड कॅमेरा अलर्ट: हे फीचर तुम्हाला तुमच्या मार्गावर येणाऱ्या स्पीड कॅमेऱ्यांबद्दल माहिती देते. हे फीचर तुम्हाला स्पीड कॅमेरे टाळण्यात मदत करू शकते.
ट्रॅफिक अलर्ट: हे फीचर तुम्हाला रस्त्यावरील गर्दी आणि इतर अडथळ्यांबद्दल माहिती देते. हे फीचर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकण्यापासून वाचवते.
ही फीचर अॅक्टीव्ह करण्यासाठी तुमच्या Google मॅपच्या ॲपमधील सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला नेव्हिगेशन टॅबवर जावे लागेल आणि ड्रायव्हिंग पर्याय निवडावे लागेल. हे फीचर सक्रिय करण्यासाठी तुम्हाला टॉगल स्विच चालू करावा लागेल. वरील फीचरमुळे तुम्ही चालान म्हणजेच दंड भरण्यापासून वाचू शकतात.
इतर काही टीप्स
नेहमी वेग मर्यादा पाळा.
वाहतूक नियमांचे पालन करा.
तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा.
आपले वाहन व्यवस्थित ठेवा.
रस्त्याकडे लक्ष द्या आणि इतर वाहनचालकांपासून सावध रहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.