Google pay saam Tv
बिझनेस

Google For India 2023: गुगलची लोन बिजनेस एंट्री; व्यापाऱ्यांना देणार तिकीट कर्ज

Google For India: गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात गुगलने व्यापाऱ्यांसाठी मोठी सुविधा देण्याची घोषणा केलीय.

Bharat Jadhav

Google For India:

गुगलच्या मोबाईल पेमेंट सर्व्हिस गुगल पेने व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट घेण्याची सुविधा सुरू केलीय. कंपनीने गुरुवारी ePayLater सोबत करार केला असून या करारामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी भांडवल उभारणे सहज शक्य होणार आहे. (Latest News)

गुगल फॉर इंडिया या आपल्या कार्यक्रमात गुगलकडून याची घोषणा करण्यात आलीय. गूगल इंडियाने म्हटले की, भारतातील व्यापाऱ्यांना कमी कर्जाची गरज आहे. त्यामुळे कंपनी गुगल प्ले अॅप्लिकेशनवर व्यापाऱ्यांसाठी छोटे तिकीट कर्ज मिळणार आहे. या सुविधेतून कंपनी व्यापाऱ्यांना १५ हजार रुपयांचे कर्ज देईल. यासोबत व्यापारी १११ रुपयांचे हप्ते देऊन या कर्जाची परतफेड करू शकतील.

युपीआयवर रुपे व्यतिरिक्त, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनेदेखील युपीआयद्वारे क्रेडिट ऑफर म्हणून क्रेडिट लाइन सुरू केल्या आहेत. Google Pay वरील क्रेडीट सुविधा अनेकांना च्या पसंतीस उतरलीय. गुगल पेद्वारे निम्म्याहून अधिक कर्ज अशा लोकांना देण्यात आले आहे ज्यांचे मासिक उत्पन्न ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कर्ज घेणारे बहुतेक कर्जदार शहरातील आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुगलने आपल्या गूगल फॉर इंडिया कार्यक्रमात अनेक मोठ्या सुविधांची घोषणा केल्या आहेत. गूगल क्लाउडच्या माध्यमातून गुगल भारतीय शेतकऱ्यांना ऑनलाईन कॅटलॉग तयार करता येईल. त्याचबरोबर शेतकरी याच्या माध्यमातून देशभरातील व्यापाऱ्यांना संपर्क करू शकतील. दरम्यान गूगलही सुविधा ONDCच्या मदतीने सुरू करेल. यासाठी साइन कॅच नावाच्या नवी एग्रीकल्चरल टेक्नॉलजीचा वापर केला जाणार आहे.

गुगलने दावा केलाय की, त्यांच्या डिजिटल पेमेंट सर्व्हिस गुगल पेला भारतात सर्वाधिक सुरक्षित बनवण्यात आले आहे. गुगल पेमुळे भारतातील १२ हजार कोटी रुपयांचा फ्रॉड रोखण्यास मदत झालीय. गुगल कंपनीने ३, ५०० प्रेडेटरी लेंडिंग अॅप्स काढून टाकले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT