Google AI Saam TV
बिझनेस

Google AI : रागारागात कर्मचाऱ्याने ठोकला रामराम, शेवटी गुगल झुकलं; २२,००० कोटी द्यावे लागले, कारण काय?

Google AI Genius Noam Shazeer : गुगलने (AI)वर आपली पकड मजबूत करण्यासाठी आता पुन्हा एकदा आर्टिफिशियल इंटेलिजंस (AI) विशेष तज्ञ नोम शाजीर यांची नियुक्ती केली आहे.

Ruchika Jadhav

सध्या सर्वत (AI) फिचरचा बोलबाला सुरू आहे. गुगलने (AI)वर आपली पकड मजबूत करण्यासाठी आता पुन्हा एकदा आर्टिफिशियल इंटेलिजंस (AI) विशेष तज्ञ नोम शाजीर यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी गुगलला तब्बल २.७ अरब डॉलर म्हणजे २२ कोटी ६०० रुपये भरावे लागले आहेत. शाजीरने याआधी साल २०२१ मध्ये सुद्धा गुगलसोबत काम केलं आहे. त्यावेळी त्याने एआय स्टार्टअप Character.AI ची स्थापना केली होती.

एआयच्या विश्वात शाजीर हे एक मोठं आणि नावाजलेलं नाव आहे. सर्वात पहिले २००० मध्ये ते गुगलशी जोडले गेले होते. त्याने गुगलमध्ये असतानाच सहकारी डेनियलसह डी फ्रीटाससह मिळून चॅटबॉक्स विकसीत केला होता. त्यांनी त्यावेळी गुगलने हा चॅटबॉक्स लॉन्च करावा अशी विनंती केली होती. मात्र गुगलने यासाठी नकार दिला आणि त्यामुळे शाजीर यांनी गुगलला रामराम ठोकला.

त्यानंतर शाजीर आणि फ्रीटास यांनी एकत्र येत Character.AI सुरू केलं. या स्टार्टअपने लगेचच सिलिकॉन वॅलीमध्ये सर्वाधीक हॉट स्टार्टअप म्हणून मान पटकावला. त्यांची एकंदर प्रगती पाहता एआयसाठी गुगलला पुन्हा एकदा आपल्या जुन्या कर्मचाऱ्याची गरज भासली. त्यामुळे गुगलने शाजीर यांना पुन्हा कंपनीत बोलावून घेतले. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली.

गुगलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाजीरला पुन्हा कंपनीत बोलवणे हेच यामागचं मुख्य कारण आहे. शाजीर येथे आल्यावर ते एआय, DeepMind, एआय मॉडेलचे नेतृत्व करतील आणि ओपन एआयची पुढे चॅटजीपीटीसह टक्कर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tayade News : वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोनं झालं; बच्चू कडुंचा पराभव करणाऱ्या तायडेंनी व्यक्त केल्या भावना

Ram Shinde: कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो..., राम शिंदेंचे थेट अजित पवारांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics: मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न, एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी, काय आहेत कारणं?

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस हे आज सायंकाळी दिल्लीला जाणार

Narendra Mehta: मंत्रि‍पदाची कोणतीही इच्छा नाही, जनतेचा विश्वास सार्थकी लावणार- नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT