Namo Shetkari Yojana Saam Tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana: ९४ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १० दिवसात खात्यात जमा होणार ₹४०००

Namo Shetkari Yojana and PM Kisan Yojana 4000 Installment : पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील जवळपास ९४ लाख शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

जिल्हा परिषद निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये

नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता येणार

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारकडून वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मिळणार पैसे मिळण्याची शक्यता आहे.

या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार ₹४००० (Namo Shetkari Yojana and PM Kisan Yojana 4000 Rupees Installment Come on These Date)

राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आली होती. पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २२वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. हा हप्तादेखील पुढच्या महिन्यात दिला जाणार आहे.

दर चार महिन्यांनी या दोन्ही योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो. पीएम किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीत पुढचा हप्ता येईल. यामुळे पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये जमा होणार आहेत.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीआधी येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे पुढच्या दहा दिवसात शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळतील.

९० ते ९४ लाख शेतकऱ्यांना फायदा

राज्यात नमो शेतकरी योजनेचे एकूण ९० ते ९४ लाख लाभार्थी आहेत.या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. केंद्र सरकारचे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आठ दिवसात राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल, असं सांगितलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

Bridal Green Bangles Design: नववधूसाठी हिरव्या चुड्याच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, प्रत्येक साडीवर उठून दिसतील

Bread Dishes : ब्रेड पासून बनणाऱ्या झटपट 5 टेस्टी डिशेस

Kalyan Dombivli : ठाकरेसेनेच्या नॉट रिचेबल नगरसेवकांचा शिंदेंसेनेला पाठिंबा? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT