Ladki Bahin Yojana PM Kisan latest newsinstallment date : राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आणि शेतकरी राजाला लवकरच खुशखबर मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रूपये तर शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये खटाखट जमा होणार आहेत. याबाबतची नवी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एकत्र ३ हप्त्यांचे पैसे मिळू शकतात, तर शेतकऱ्यांना २ हप्ते एकत्र मिळतील, असे सांगण्यात येत आहे. सकाळमध्ये याबाबतचे वृत्त देण्यात आलेय.(Ladki Bahin Yojana pending installment latest update)
राज्यातील सव्वादोन कोटी महिलांना डिसेंबरपासून अद्याप एकाही हप्त्याचे पैसे खात्यात आलेले नाहीत. दुसरीकडे सन्मान निधी योजनेचा लाभ (Farmers ₹6000 installment credit date Maharashtra) घेणारे राज्यातील ९३ लाख शेतकरीही आठव्या आणि नवव्या हप्त्याची वाट पाहत आहे. लाडकी अन् सन्मान निधी या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारला १४ हजार कोटी रूपयांची आवशक्यता आहे. पण याबाबत अर्थ खात्याकडून अद्याप निधी मंजूर झालेला नाही. मंत्रालयातील विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना ६ हजार तर लाडक्या बहिणींना ४५०० एकत्र मिळू शकतात, फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्चच्या सुरुवातीला लाभाचे वितरण केला जाऊ शकतो. (PM Kisan Samman Nidhi 8th and 9th installment Maharashtra)
राज्यात सध्या सव्वा दोन कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. ईकेवायसीद्वारे लाडक्या बहिणींची (Ladki Bahin Yojana eKYC verification update) सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीनंतर राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या दीड कोटींपर्यंत येऊ शकते, असा अंदाज एका अधिकार्याने व्यक्त केला. लाडकीच्या पडताळणीनंतर राज्याचे प्रत्येक महिन्याला १६३५ कोटी रूपयांची बचत होतात. म्हणजेच वर्षाला १९ हजार ६२० कोटींची राज्याची बचत होतील, असा अंदाज आहे. दुसरीकडे फ्रेबुवारीच्या अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचा २२ वा हप्ता जमा होईल. तर राज्य सरकारकडून आठवा अन् नववा हप्ता मिळेल. काही दिवसांपूर्वीच सन्मान निधीतील लाभार्थीं शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे. आता राज्यातील ९१ लाख १६ हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा २२ वा हप्ता वितरित होईल. त्याच शेतकऱ्यांना राज्याचे दोन हप्ते मिळतील, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेय.
राज्यातील लाडक्या बहिणींची पडताळणी अखेरच्या टप्प्यात आहे. पडताळणीनंतर एक एप्रिलपासून पात्र लाडक्या बहिणींच्याच खात्यात दरमाह १५०० रूपयांचा लाभ जमा होणार आहे. १ जुलै २०२४ मध्ये राज्यात लाडकी बहीण योजना सुरू झाली. यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त अपात्र महिलांनीही अर्ज केल्याचे आकडेवारीतून समोर आलेय. आधीच केंद्र अन् राज्याच्या योजनेचा लाभ घेणारे, चारचाकी, सरकारी नोकरी असे निकषात न बसणारे अनेक अर्ज होते. या सर्वांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२६ पासून फक्त पात्र महिलांच्या खात्यातच लाभ मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.