UPI Update  chatgpt
बिझनेस

UPI Update : UPI वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! इंटरनेटशिवायही होणार UPI पेमेंट; या फिचर्सबद्दल जाणून घ्या

Digital Payment Update : तुम्ही रोज व्यवहार करताना UPI चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला पेमेंट करताना इंटरनेटची गरज भासणार नाही.

Sakshi Sunil Jadhav

सध्या सगळ्याच गोष्टी डिजिटल पद्धतीने होत आहेत. शाळेच्या फीपासून (Fee) ते भाजीवाल्यापर्यंत सर्वच UPI पेमेंटचा वापर करतात. त्यामुळे लोक जास्त कॅशसुद्धा जवळ ठेवत नाहीत. त्यातच ऑनलाइन UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये तुम्ही इंटरनेटचा वापर न करता सहज पेमेंट करू शकता.

आता सर्वांनाच सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात पेमेंट करता यावं यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) लवकरच एक नवीन Tap-to-Pay ही सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या सुविधेमध्ये NFC (Near Field Communication) टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. युजर्सनी आधी इंटरनेट मोबाईल असतानाच UPI Lite वॉलेटमध्ये पैसे लोड करायचे आहेत. त्यानंतर इंटरनेट नसतानाही NFC- मोबाईल PoS मशीनला टॅप करून २००० पर्यंतचे पेमेंट करता येईल. या व्यवहारासाठी UPI PIN टाकण्याची गरजही लागणार नाही.

तसेच ही सुविधा विमान प्रवास, मेट्रोचे नेटवर्क, खेड्यामध्ये किंवा इंटरनेट कनेक्शन नसलेल्या किंवा कमी असलेल्या ठिकाणी खूप फायदेशीर ठरेल. व्यवहाराच्या वेळी PoS मशीन पेमेंटची माहिती सुरक्षित ठेवेल आणि इंटरनेट मिळाल्यावर ती तपासणीसाठी पुढे पाठवली जाईल. हा लाभ देण्यासाठी PoS टर्मिनल उत्पादक कंपन्यांना NPCI कडून प्रमाणपत्र घ्यावं लागेल. तसेच बँका आणि गुगल पे, फोन पे, BHIM असे UPI अॅपही त्यांच्या अॅपमध्ये हे फिचर जोडण्यावर काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

Banking fraud: OTP न सांगताही बँक खातं रिकामं होऊ शकतं? स्कॅमर्सच्या नव्या युक्तीने होईल नुकसान

भारतात डेंग्यूच्या पहिल्या लशीला मंजुरी, डेंग्यूपासून लवकरच सुटका होणार

सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनात धडकल्या, स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT