Mukhyamantri Annapurna Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! आता साध्या कागदावर अर्ज करुन मिळवता येणार ३ मोफत गॅस सिलिंडर

Mukhyamantri Annapurna Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ३ मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून ३ घरगुती सिलिंडर मोफत मिळणार आहे. ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलिंडरची कनेक्शन आहे. त्यांनाच या योजनेअंतर्गत मोफत सिलिंडर मिळतात. त्यामुळे आता ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्यांना ते करुन घेण्याची सुवर्णसंधी आहे. (Mukhyamantri Annapurna Yojana)

अनेक पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्या ते स्वतः च्या नावावर करु शकतात. याच पार्श्वभूमीवर आता तुम्ही तुमच्या घराजवळील गॅस एजन्सीमधून तुमच्या नावावर गॅस कनेक्शन घेऊ शकतात.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जातात. यामध्ये लाडक्या बहिणींनादेखील सिलिंडर मिळणार आहे. परंतु अनेक महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याने त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. सोलापूरमधील तब्बल अडीच लाख महिला अन्नपूर्णा योजनेपासून लांब आहेत. (Ladki Bahin Yojana Update)

तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन साध्या कागदावर अर्ज करुन गॅस कनेक्शनवरील नाव बदलू शकतात. तुम्हाला फक्त एका साध्या कागदावर अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचे नाव बदलेल. यानंतर महिलांना योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. सुरुवातीला लाभार्थी महिलांना संपूर्ण पैसे द्यावे लागणार आहे त्यानंतर शासनाचे अनुदान तुमच्या खात्यात जमा केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT